चांदवड तालुक्यात पंचायत समिती गणातून ‘ एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदे ‘ चे गणसमन्वयक , गणसहसमन्वयक व गणसंघटक या पदांवर निवड
निवड झालेल्यांना लवकरच एमआयटी , पुणे येथे प्रशिक्षणासाठी निमंत्रित करण्यात येणार
‘ एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदे ‘ च्या चांदवड तालुक्यातील पदाधिका – यांचे माहितीफॉर्म्स भरण्यासाठी वडाळीभोई येथे नुकतीच बैठक संपन्न झाली.’ एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या कार्यविस्तारासाठी महाराष्ट्र राज्यात पदाधिका – यांचे अभ्यासपूर्वक नेटवर्क संघटित करण्यात येत आहे . या अभियानात निवड करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पदाधिका – यांची सर्व व्यक्तिगत माहिती फोटो संकलीत करण्यात येत असून त्यांना लवकरच ‘ एमआयटी , पुणे येथे प्रशिक्षणासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे .
बुधवार , २४ नोव्हेंबर २१ रोजी नाशिक जिल्हयाच्या चांदवड तालुक्यातून निवड करण्यात आलेल्या पदाधिका – यांच्या व्यक्तिगत माहिती संकलनासाठी चांदवड तालुक्यातील वडाळीभोई ग्रामपंचायतीच्या सभागृहात ही बैठक संपन्न झाली . चांदवड पंचायत समितीच्या माजी सभापती व वडाळीभोई ग्रामपंचायतीच्या विदयमान सरपंच सौ अनिताताई सुकदेव जाधव व उपसरपंच आणि ‘ एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदे’चे वडाळीभोई गणाचे समन्वयक श्री निवृत्ती घाटे यांनी सर्वांचे स्वागत केले . ‘ एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक श्री योगेश पाटील ,
सहसमन्वयक श्री प्रकाशराव महाले , नाशिक विभाग समन्वयक श्री संजय भांबर , चांदवड तालुका समन्वयक श्री विजय जाधव , चांदवड तालुका संघटक श्री अनिल काळे यांनी या बैठकीत पदाधिका – यांशी संवाद साधुन माहिती संकलन केले . ‘ एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट ‘ चे प्रणेते श्री राहुलजी कराड यांची विचारभूमीका विशद करून ‘ एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदे ‘ ची संघटनात्मक रचना व अभ्यासपूर्वक संयोजित करण्यात येणा – या विविध उपक्रमांविषयी श्री योगेश पाटील यांनी सविस्तरपणे माहिती दिली .श्री प्रकाशराव महाले यांनी प्रास्ताविक करून सरपंच संसदेचा कार्यपरिचय केला . श्री . संजय भांबर यांनी स्वागत केले . श्री . विजय जाधव यांनी सुत्रसंचालन केले . श्री . अनिल काळे यांनी समारोप केला . चांदवड तालुक्याच्या एकुण ०८ पंचायत समिती गणातून ‘ एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदे ‘ चे गणसमन्वयक , गणसहसमन्वयक व गणसंघटक या पदांवर निवड करण्यात आलेले श्री निवृत्ती घाटे ( वडाळीभोई ) , श्री शंकरराव जाधव ( शेलू ) ,
श्री अॅड . पवनकुमार जाधव ( गोहरण ) , श्री अनिल पवार ( वडनेर भैरव ) , श्री महेश पाटील ( पिंपळणारे ) , श्री डॉ . दिलीप शिंदे ( देवरगाव ) , श्री परशराम निकम ( परसूल ) , श्री रविंद्र जाधव ( मंगरूळ ) , श्री विलास भवर ( दहयाणे ) , श्री संजय महाराज शिंदे ( कानमंडाळे ) , श्री सुदाम लांडगे ( चिखलआंबे ) , श्री . संदिप शिंदे ( वडाळीभोई ) , श्री बिटटु भोईटे ( हिवरखेडे ) , श्री . अॅड . प्रविण ठाकरे ( सोनीसांगवी ) , श्री साईनाथ कोल्हे ( विटावे ) , श्री धनंजय ठाकरे ( साळसाने ) , श्री हावशीराम गुंजाळ ( रायपूर ) , श्री विजय गांगुर्डे ( कानडगाव ) , श्री विक्रम देवरे ( दरेगाव ) , श्री नागुजी आहेर ( निमोण ) , श्री . भाऊसाहेब शेलार ( गंगावे ) , व गोरक्षनाथ शिंदे ( डोंगरगाव ) हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . ‘ एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे नाशिक विभाग समन्वयक श्री संजय भांबर चांदवड तालुका समन्वयक श्री विजय जाधव , चांदवड तालुका संघटक श्री अनिल काळे व वडाळीभोई गण समन्वयक श्री निवृत्ती घाटे यांनी या बैठकीचे आखिवपणे आयोजन केले.

