चांदवडच्या कन्येचा जावयांसोबत सत्कार करून दिल्या परदेशातील भावी वाटचालीस शुभेच्छा
चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथे झालेल्या एमआयटी राष्ट्रीय संसदेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक विशेष सत्कार करण्यात आला. तालुक्यातील विविध गावांमधील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला. निमित्त होते ते नुकतेच विवाहबद्ध झालेल्या तालुक्यातील कन्या यांच्या परदेशी गमणाच्या निमित्ताने हा सत्कार करण्यात आला. 
चांदवड पंचायत समितीचे माजी उपसभापती व नामवंत व्यवसायीक अनिल रामकृष्ण काळे यांच्या कन्या प्रणाली यांचा विवाह नुकताच नाशिक येथे चि.अक्षय यांच्याशी संपन्न झाला. चि.अक्षय हे अमेरिकेतील उच्चभ्रू अशा न्यू-जर्शी या शहरात नौकरीस आहेत. अनिल काळे हे राजकीय क्षेत्राबरोबरच एम आयटी सरपंच संसद, ग्राम समुर्ध्दी फाऊंडेशन या सामाजिक कामात सहभागी असल्याने साहजिकच त्यांच्या कन्या व जावयांचा यथोचित सत्कार करण्याचा मानस अनेकांनी व्यक्त केल्याने हे नवदाप्यंत वडाळीभोई येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहिले. यावेळी संसद प्रमुख मा.योगेश पाटील, सह.समन्वयक प्रकाश महाले,चांदवड तालुक्याच्या वतीने संजय भांबर, विजय जाधव, वडाळीभोईच्या वतीने सरपंच अनिताताई जाधव, उपसरपंच निवूत्ती घाटे आदींनी त्यांचा सत्कार केला. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व आपल्या मनोगतामध्ये अनेक वक्तयांनी प्रशंसनीय गौरवोद्गार काढले. उपस्थितांनीही सत्कार केला. यावेळी 
निवृत्ती घाटे ( वडाळीभोई ) , श्री शंकरराव जाधव ( शेलू ) , श्री अॅड . पवनकुमार जाधव ( गोहरण ) , श्री अनिल पवार ( वडनेर भैरव ) , श्री महेश पाटील ( पिंपळणारे ) , श्री डॉ . दिलीप शिंदे ( देवरगाव ) , श्री परशराम निकम ( परसूल ) , श्री रविंद्र जाधव ( मंगरूळ ) , श्री विलास भवर ( दहयाणे ) , श्री संजय महाराज शिंदे ( कानमंडाळे ) , श्री सुदाम लांडगे ( चिखलआंबे ) , श्री . संदिप शिंदे ( वडाळीभोई ) , श्री बिटटु भोईटे ( हिवरखेडे ) , श्री . अॅड . प्रविण ठाकरे ( सोनीसांगवी ) , श्री साईनाथ कोल्हे ( विटावे ) , श्री धनंजय ठाकरे ( साळसाने ) , श्री हावशीराम गुंजाळ ( रायपूर ) , श्री विजय गांगुर्डे ( कानडगाव ) , श्री विक्रम देवरे ( दरेगाव ) , श्री नागुजी आहेर ( निमोण ) , श्री . भाऊसाहेब शेलार ( गंगावे ) , व गोरक्षनाथ शिंदे ( डोंगरगाव ) हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . ‘ एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे नाशिक विभाग समन्वयक श्री संजय भांबर चांदवड तालुका समन्वयक श्री विजय जाधव , चांदवड तालुका संघटक श्री अनिल काळे व वडाळीभोई गण समन्वयक श्री निवृत्ती घाटे यांनी या बैठकीचे आयोजन केले.

