[masterslider id="2"]
कविता काव्य - संकलन काव्यरसास्वाद विशेष लेख संमिश्र वार्ता हेल्थ

नंदकिशोर ठोंबरे यांच्या “मी मला शोधताना” या काव्यसंग्रहातील एक सुंदर सुगंधी काव्यपुष्प

यांनी लिहिलेले वंदना गांगुर्डे

● बाप

जेथे खडकास पाझर
आणि
ओंडक्यास अंकुर फुटतो
मग ‘हा’ तर हाडामांसाचा माणूस
त्याला ‘बाप’ कसा अपवाद असतो?

‘अव्यक्त’ भासणारा बाप
हिमनगासारखा असतो
दिसतो त्यापेक्षा कितीतरी
मोठा भाग ‘अदृश्य ‘असतो

वरुन भासणाऱ्या खड़कात
आत कोठेतरी झरा असतो.
खळखळ वहात नसला तरी
अमृत होऊन तृष्णा भागवितो.

प्रत्येक बाप मनाने गोराच असतो
फ़क्त परिस्थितिने उन्हात रापतो
म्हणून, मातृत्वाच्या सौंदर्यापुढे
स्वतःला कधी उभा करत नसतो

बाप हा बाप झाल्या शिवाय
कधीच कोणाला कळत नसतो.
बापाच्या नजरेतील त्याचा बाप
त्याच्या प्रति तो समर्पित असतो.

– नंदकिशोर ठोंबरे
नाशिक
९८८१०७४४४१

कवी – नंदकिशोर ठोंबरे पुस्तक – मी मला शोधताना प्रकाशक – परीस पब्लिकेशन किंमत -₹ १५०/-

कवी “नंदकिशोर ठोंबरे” नाशिक यांच्या “मी मला शोधताना” या काव्यसंग्रहातील ‘बाप” ही कविता खरंच खुप सुंदर आहे.आईच्या मायेइतकीच लेकरांवर बापाचीही माया असते त्याचं सुंदर वर्णन कवितेत आहे.

कवी म्हणतात, ” जिथे खडकाला पाझर फुटतो अन ओंडक्यालाही अंकुर फुटतो तिथं बाप कसा बरं अपवाद असेल?
अव्यक्त बाप हा हिमनगासारखा असतो आणी दिसतो त्यापेक्षाही कितीतरी मोठ्ठा भाग अदृश्य असतो. कवी म्हणतात, ” की जसे खडकाच्या आत कोठेतरी झरा असतो. अन जरी तो खळखळ वाहत नसला तरी अमृत होऊन तहान मात्र नक्कीच भागवतो.तसेच बाप हा दाखवत नसला तरी त्यात मायेचा ओलावा नक्कीच असतो.
प्रत्येक बाप हा मनाने गोराच आहे पण परिस्थितीमुळे उन्हात रापतो कष्ट करतो त्याच्याच परिणामामुळे मातृत्वाच्या सौंदर्यासमोर स्वतःला मात्र तो कधीच उभं करत नाही.

कवी ठोंबरे म्हणतात की, खरंच बाप हा खऱ्या अर्थाने प्रत्येकजण बाप झाल्यावरच कळतो…..

खूपच छान असे हे नंदकिशोर ठोंबरे यांच्या “मी मला शोधताना” या काव्यसंग्रहातील एक सुंदर सुगंधी काव्यपुष्प……

वंदना गांगुर्डे
नाशिक

 

कवी – नंदकिशोर ठोंबरे
पुस्तक – मी मला शोधताना
प्रकाशक – परीस पब्लिकेशन
किंमत -₹ १५०/-

लेखकाबद्दल

वंदना गांगुर्डे

लेखका , कवयित्री

एक टिप्पणी द्या