[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

जिल्हा जिल्हा परिषद शाळा वाकी खुर्द येथे मानव स्पर्श सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व स्वराज्याचे चलन शिवराईचे प्रदर्शनाचे आयोजन…

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

दि. 5/02/2022 मानवस्पर्श सेवाभावी संस्था, लासलगाव यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी खुर्द येथे कै. सोपान (काका) सिताराम देवढे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व स्वराज्याचे चलन शिवराई चे प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय बिरार, लासलगाव (इतिहास संशोधक, व्याख्याते व समाजसेवक) लाभले. गावचे सुपुत्र आर्मी मॅन पुरूषोत्तम जाधव यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पाटीलबा जाधव यांनी भूषवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक गणेश औटी सर यांनी केले. संस्थेची वाटचाल कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील देवढे सर यांनी केले. आलेल्या पाहुण्यांचा शाळा व्यवस्थापन समिती तर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे यांनी आपल्या व्याख्यानात स्वराज्याचे चलन शिवराई बाबत अनमोल असे मार्गदर्शन केले उपस्थित मान्यवर तसेच शाळेतील विद्यार्थी यांनी स्वराज्याचे चलन शिवराई ची पाहणी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले शाळेतल्या सर्व 48 विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यात चित्रकला वही, मिक्स वही, शॉपनर, पेन्सिल, मराठी अंकलिपी, इंग्रजी अंकलीपी, खोडरबर आदि. साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी वाहेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख कौतिक वाकचौरे सर यांनी आपल्या भाषणामध्ये शाळेच्या विकासाबाबत व प्रगतीबाबत माहिती देत, शाळा विकासाचा चढता आलेख मांडला. तसेच शाळेतील शिक्षक, गावचे सरपंच उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, गावातील विविध मान्यवर यांचे अभिनंदन केले, आभार मानले. प्राध्यापक मा. सरपंच अरुण देवढे यांनी शाळेतील शिक्षकांचे कौतुक करत भविष्यात शाळेसाठी विविध माध्यमातून समाजसहभाग मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील वाकचौरे, उपाध्यक्ष सूर्यकांत जाधव, संस्थेचे खजिनदार सुनील देवढे, संस्थेचे विश्वस्थ तथा सभासद केशवराव जाधव, योगेश न्याहारकर, अरुण देवढे अनिल देवढे आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी मानव स्पर्श सेवाभावी संस्थेचे सदस्य समीर देवढे, ज्ञानेश्वर देवढे, ज्ञानेश्वर शिंदे, सोपान जाधव, अनंत सोमवंशी, गोरख देवढे, सौ. सुरेखा देवढे, डॉ.शशिकांत देवढे, सचिन शेलार, प्रताप आढाव यांचे सहकार्य लाभले.
प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बंडूभाऊ देवढे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ जगताप, उपाध्यक्ष बाबाजी भाऊ जाधव, माजी अध्यक्ष दादाराम जाधव, गावचे पोलीस पाटील दिगंबर कदम, विलास थोरात, बाबाजी थोरात, शिक्षक प्रवीण जाधव तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक गणेश औटी सर यांनी सर्वांचे आभार मानले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या