वडनेर भैरव प्रतिनिधी सततच्या नैसर्गिक बदलांची नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक संघर्ष करीत आला असून या संघर्षमय परिस्थितीतुन नाशिक जिल्ह्याचा द्राक्ष हंगाम मोठ्या जोमाने सुरू झालेला आहे
जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक अस्मानी आणि सुलतानी संकटांशी नेहमीच दोन हात करीत आलेला आहे. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी सतत मदतीच्या भूमिकेतून कार्यरत राहील, केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांच्या माध्यमातून आलेल्या अडचणींचा पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन उदगार जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य व भाजपा गटनेते डॉक्टर आत्माराम कुंभार्डे यांनी वडनेर भैरव येथे द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्याशी द्राक्ष हंगाम बाबत चर्चा करताना व्यक्त केले .वडनेर भैरव येथील सलादे बाबा नाथ कृपा फार्म येथे डॉक्टर आत्माराम कुंभार्डे यांनी सदिच्छा भेट देऊन या फार्म वरती युवा द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद साधला .यावेळी त्यांच्या समवेत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नाना घुले फौजी, इंदुमती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक विकास भुजाडे ,चांदवड तालुका भाजपा युवा नेते संतोष नाना सलादे, प्रगतशील शेतकरी अर्जुन नाना पाचोरकर ,वडनेर भैरव चे उपसरपंच योगेश साळुंखे हे होते. वडनेर भैरव येथील द्राक्ष उत्पादक युवा शेतकऱ्यांची संवाद साधतांना चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन व भाजपा जिल्हा नेते डॉक्टर आत्माराम कुंभार्डे यांनी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक गेल्या अनेक वर्षांपासून आस्मानी आणि सुलतानी संकटांशी सामना करीत द्राक्ष हंगाम यशस्वी करीत असतात या वर्षाचा द्राक्ष हंगाम हा मोठ्या जोमात सुरू झालेला असून निसर्गाचा लहरीपणा आणि व्यापारी वर्गाची बऱ्याचदा भूमिका त्यामुळे द्राक्ष उत्पादक हे सतत लढत असतात यावेळी नाना सलादे अर्जुन पाचोरकर मनीष सुरेश सलादे रवींद्र अशोक सलादे संदीप केशव सलादे माणिक काशिनाथ सलादे अनिल कारभारी सलादे धीरज साहेबराव सलादे भानुदास सलादे बापू सलादे पप्पू साळुंके भैय्या सलादे यांनी व्यापारी मागणी मिळणारे भाव दरवर्षी शेतकऱ्यांची होणारी फसवणूक औषध यांचे वाढलेले भरमसाठ भाव त्याच बरोबर बांगलादेश बॉर्डर याबाबत चर्चा केली डॉक्टर आत्माराम कुंभार्डे यावेळी म्हणाले की केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकरी यांना केंद्रस्तरावर येणाऱ्या अडचणींबाबत पाठपुरावा केला जाईल नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हा दरवर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटांना बळी पडतो यातून बाहेर पडण्यासाठी विविध उपाय योजना करणे गरजेचे आहे जिल्हा परिषद व कुषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जी जी मदत लागेल ती ती उपलब्ध करून दिली जाईल असेही त्यांनी युवक शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले

