[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दरेगाव येथे पंचायत समितीच्या उपसभापतींच्या निधितुन पाण्याच्या दोन टाकींच्या बांधकामांचा शुभारंभ

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

दरेगाव येथे पंचायत समितीच्या उपसभापतींच्या निधितुन पाण्याच्या दोन टाकींच्या बांधकामांचा शुभारंभ

चांदवड पंचायत समितीचे उपसभापती शिवाजीराव सोनवणे यांनी त्यांच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून दरेगाव येथे धनदाई मंदिरात पाण्याचा टाकी व आदिवासी वस्तीत पाण्याची टाकी ही कामे मंजूर केली असुन या कामांचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड व पंचायत समितीचे उपसभापती शिवाजी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी
दरेगाव येथे कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष पै. विजयनाना गांगुर्डे,डोणगांव सरपंच जगदीश शेळके, दरेगाव सरपंच अमोल देवरे, दरेगाव सोसायटी चेअरमन विक्रम देवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेसनखेडे गणप्रमुख रावसाहेब देवरे, सहगणप्रमुख दत्तु पगार, बाबाजी देवरे, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास पगार,निव्रुत्ती शेळके, रवींद्र जेजुरे,विक्रम गांगुर्डे, संजय गांगुर्डे,भगवान बाराहाते,शंकर गायकवाड, दावल पिंगळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
धनदाई मंदिरात व आदिवासी वस्तीत पाण्याची टाकी व्हावी, अशी मागणी काही महींन्यापुर्वी दरेगाव सोसायटी चेअरमन विक्रम देवरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेसनखेडे गणप्रमुख रावसाहेब देवरे,मेसनखेडे सहगणप्रमुख दत्तु पगार, विठ्ठल देवरे,धनदाई देवी भाविक मंडळी व दरेगाव ग्रामस्थ यांनी केली होती. अखेर शब्दाला जागत उपसभापतींनी अखेर येथे पंचायत समितीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या पाणीपुरवठा बंदीत निधीतून सुमारे एक लाख विस हजार रुपये खर्च करून पाच हजार लिटर क्षमतेची टाकीचे बांधकाम सुरू होत आहे. तसेच त्यांनी गावातील आदिवासी बांधवांच्या वस्तीतील जागेवर दहा हजार लिटर क्षमतेची टाकी मंजूर केली असुन त्यासाठी दोन लाख सहासष्ठ हजार सातशे रूपये मंजूर करण्यात आले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या