महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मा.ना. नवाब मलिक यांना ईडी सिबीआय या केंद्रीय तपास यंत्रनेचा गैरवापर करून सुडबुध्दीने कोणतीही नोटीस न देता अटक केली. नबाब मलिक हे ईडी सारख्या तपास यंत्रनेचा गैरवापरा बाबत आवाज उठवत होते हा राग मनात धरून भाजपाने कायद्याची पायमल्ली करीत हम करो सो कायदा अशा प्रकारे अटक केली या घटनेचा चांदवड तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस जाहिर निषेध करित असल्याचे निवेदन प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख साहेब तसेच पोलिस निरीक्षक समीर बारवकर साहेब यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सयाजीराव गायकवाड, शहराध्यक्ष प्रकाश शेळके, युवक तालुकाध्यक्ष दत्ता वाघचौरे, जिल्हा नेते विजय जाधव, सुनिलतात्या कबाडे, नगरसेवक अँड. नवनाथ आहेर ,अल्ताफभाई ताबोली, युवक अध्यक्ष विकी जाधव, मतिन घासी, रोनक कबाडे, इजि रमेश वाघचौरे, राहुल एलीजे ,संदिप शिंदे ,दशरथ ठाकरे, तुकाराम सोनवणे बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते.

