[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

माध्यमिक विद्यालय शिंगवे येथे लसीकरण मोहीमेच्या आरोग्य पथकाचे स्वागत व सत्कार

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

माध्यमिक विद्यालय शिंगवे ता चांदवड जि नाशिक येथे गुरुवार दि 24 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मेसनखेडे अंतर्गत वय वर्षे 15 ते 18 च्या विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत सहभागी डॉ प्रशांत खैरे, सोबत सहकारी नर्सेस, आशा सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रम प्रसंगी डॉ.प्रशांत खैरे व त्यांच्या सहकारी सेवकांचे विद्यालयात स्वागत व सत्कार करण्यात आला. पथक प्रमुख डॉ खैरे यांचा सत्कार श्री मतोबा महाराज वि.वि कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री संजय आहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी डॉ.खैरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री आवारे सरांनी सूत्र संचालन केले व श्री माळी सरांनी आभार मानले.यावेळी मेसनखेडे वि.का.सेवा. सहकारी सोसायटीचे चेअरमन
श्री.राजेंद्र गांगुर्डे सर,श्री वाले सर,श्री शेळके सर,श्री गायकवाड सर,श्री पवार सर,श्री संजय खताळ सर (ग्रामपंचायत सदस्य),संजय देवरे सर, श्री जे. के.खताळ सर (माजी चेअरमन)इत्यादि.उपस्थिती होती.

Sending
User Review
4 (1 vote)

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या