[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

कुंदलगांव येथे आमदार निलेश लंके यांनी दिली सदिच्छा भेट

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुक्यातील कुंदलगांव येथे आमदार निलेशजी लंके साहेब जळगाव ( नि.) येथे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असताना त्यांनी भेट दिली. त्यांनी शनिवारी अचानक कुंदलगाव ( ता. चांदवड ) या ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी चांदवड कुषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक व मा.सरपंच राजेंद्र गिडगे, सरपंच दयानंद अहिरे यांनी आमदार निलेश लंके यांचा सत्कार केला. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. यावेळी आ.लंके यांनी कोणत्याही संदर्भात मदतीसाठी आपण तयार असल्याचे उपस्थितींना सांगितले.
यावेळी तुषार कारंडे,सोनु बिडगर, विष्णू कडनोर,बाळु नरोटे, सागर कडनोर, समाधान कडनोर, दत्तु कडनोर,किरण नागरे आदी उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या