चांदवडच्या आदिवासी बांधवांच्या घरकुल प्रश्नावर व नवीन डीपीआर यादी मंजुरीप्रश्नी माजी आमदार शिरिषकुमार कोतवालांचा आक्रमक पवित्रा.
स्वतः उपोषणाला बसण्याचा प्रशासनाला इशारा
चांदवडचे माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल यांनी चांदवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चांदवड नगरपरिषद हद्दीतील आदिवासी बांधवांना घरकुल योजनेच्या अनुदान रक्कमा तात्काळ उपलब्ध करुन देणेबाबत व नविन डीपीआर यादी मंजुर करण्यात यावी यासाठी घरकुल लाभार्थ्यांसोबत दिंनांक अठरा एप्रिल पासून नगरपालिकेच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांदवड नगरपरिषद हद्दीत मोठ्याप्रमाणात आदिवासी बांधव राहत आहे . या आदिवासी बांधवांना नगरपरिषद स्थापन झाल्यापासुन ते आजपर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळणेसाठी वेळोवेळी संघर्ष करावा लागलेला आहे . सन २०१८-१९ या कालावधीत अनुसुचीत जाती व जमाती व इतर प्रवर्गातील गरिब कुटूंबातील रहिवाशांनी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळणेसाठी अर्ज केलेले होते . त्यात फक्त १२० रहिवाशांना घरकुल योजना मंजुर झालेली असुन मंजुर केलेल्या घरकुलानुसार १२० लाभार्थ्यांनी घर बांधकामे करण्यास सुरुवात केलेली आहे . त्यात काही लाभार्थ्यांना सुरुवातीस रक्कमा मिळालेल्या आहेत . त्यात त्यांनी मिळालेल्या रक्कमेतुन घराचे बांधकाम केले आहे . मात्र काही लाभार्थ्यांना अजुनही रक्कमा मिळालेल्या नसल्याने त्यांचे घरे अर्धवट स्थितीत आहे . घरे अपुर्ण स्थितीत असलेल्या लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहेत . याबाबत संबंधित रहिवाशांनी नगरपरिषदेकडे चौकशी केली असता , राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानुसार वाटप करण्यात आलेले आहे , मात्र केंद्र शासनाकडून निधी मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे . चांदवड शहराची लोकसंख्या २० ते २५ हजार इतकी असतांना प्रशासनाकडून केवळ १२० घरकुलांना मंजुरी देण्यात येते . तसेच चांदवड शहरातील अजुनही असंख्य गरिव रहिवाशी कच्च्या घरात राहत आहे . नगरपरिषद चांदवड अंतर्गत १२० मंजुर घरकुलांपैकी ८२ घरकुले आजही अनुदानापासून वंचित आहेत . त्यामुळे मागील ३ ते ४ वर्षांपासुन माझ्या चांदवड शहरातील अनुसुचित जाती , जमाती व इतर प्रवर्गातील गरिब कुटूंबातील रहिवाशांना स्वतःच्या हक्काच्या घरापासुन वंचित राहावे लागत आहे . याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील नगरपरिषद प्रशासन केंद्राकडे पंतप्रधान आवास योजनेकडे पाठपुरावा करणेस व लाभार्थ्यांना पैसे देण्यास असमर्थ असल्याचे व प्रशासनाकडून उडवा उडवीचे उत्तरे मिळत असल्याच्या तक्रारो या लाभार्थ्यांकडून होत आहे . तसेच आपण देखील कामांना प्राधान्य देऊन कामे पुर्ण करणेबाबत योग्य ते लक्ष देत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे . मागील ३ ते ४ वर्षांपासुन घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पुर्ण होत नसल्याने व वेळोवेळी आपणाकडे पाठपुरावा करुनही कोणताही न्याय मिळत नसल्याने या लाभार्थ्यामधील असंतोष दिवसेंदिवस वाढत चाललेला असून ही बाब अन्यायकारक आहे , यांस सर्वस्वी आपण जबाबदार आहात . • तसेच घरकुल मंजुर झालेपासुन ते आजतागायत संबंधितांना कच्च्या , पडक्या घरांमध्ये वास्तव करावे लागत आहे . त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कापासुन आपण वंचित ठेवत आहात .
तरी आपणांस या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की , चांदवड शहरासाठी मंजुर १२० घरकुलांचे कामांना १५ दिवसाचे आत तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्यात यावा , तसेच नविन डीपीआर मंजुर करण्यात येऊन ती देखील कामे सुरु करण्यात यावी , सदरची मागणी वेळेत मंजुर न झाल्यास अनुसुचित जाती , जमाती व इतर प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यासमवेत मी स्वतः दि . १८/०४/२०२२ पासुन आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल ,त्यापासुन होणा-या परिणामांस व कायदा सुव्यवस्थेस आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील . याची नोंद घेण्यात यावी . तसेच घरकुल योजनांच्या रक्कमा अदा करणेबाबत तात्काळ कार्यवाही करावी , अशी मागणी माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल यांनी केली आहे.सदर निवेदनाची प्रत माहितीसाठी . उपविभागीय अधिकारी चांदवड व पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन , चांदवड यांना देण्यात आली आहे.

