खडकजांब ता.चांदवड येथील स्मशानभूमी वादासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार उपोषण करून देखील मार्ग निघत नसल्यामुळे तसेच १६ एप्रिल रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आ.डॉ.राहुल दादा आहेर यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची भेट घेत सदर गंभीर विषयाची सखोल चौकशी करून तात्काळ स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली तसेच जिल्हाधिकारी महोदय यांनी लवकरच संबंधित अधिकारी व ग्रामस्थां सोबत बैठक घेण्यात येईल असे आश्वासित केले.

