चांदवड : सोमवार दिनांक २८/०४/२०२२ रोजी श्रीमती जे.आर.गुंजाळ विद्यालयात उपस्थित देणगीदारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. म.वि. प्र.संचालित चांदवड शाखेचा सुवर्ण महोत्सव चांदवड तालुका संचालक श्री.उत्तमबाबा भालेराव यांचे मार्गदर्शनाने होणार होता.परंतु कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढल्याने सदर कर्यक्रम रद्द करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी देणगीदारांनी जी रक्कम जमा केली होती.ती रक्कम सन्माननीय संचालक श्री.उत्तमबाबा भालेराव याचे मार्गदशनानुसार संबधित देणगीदारांना आज परत करण्यात आली.
या वेळी शालेय समिती अध्यक्ष श्री.विजुभाऊ कोतवाल,उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष श्री.सुभाषदादा कोतवाल,जेष्ठ सदस्य श्री.अशोककाका व्यवहारे, श्रीम.भारतीताई देशमुख,प्राचार्य श्री.लोहकरे एस.एन.,संस्थेच्या सेवक संचालिका सौ.नंदाताई सोनवणे,श्री.पाटील एस.पी.श्री.जिभाऊ शिंदे,श्री.न्याहारकर डी.एम.सर्व देणगीदार बंधू भगिनी ,शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.

