[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

यावल महाविद्यालयात वसुंधरा दिन साजरा…

यांनी लिहिलेले सुभाष कामडी

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला महाविद्यालयाच्या ग्राउंडची सकाळी स्वच्छता विद्यार्थ्यांकडून कडुन करण्यात आली नंतर वसुंधरा दिनाचं महत्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रथम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा डॉ आर डी पवार यांनी वसुंधरा दिनाचं महत्व पटवून सांगितले त्यासाठी पावसाळ्यात वृक्षारोपण करून ती जगवली पाहिजे झाडाचे, निसर्ग सृष्टीचे, अतिशय अनण्य साधारण महत्व मानवी जीवनातील आरोग्य स्वच्छ व सभोवतालच्या परिसरात सुंदर वातावरण ठेवण्यासाठी होते याबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांनी वसुंधरा दिनाचं महत्व पटवून जाणिव जागृती करताना आज ऑक्सिजनची गरज आहे ऑक्सिजनचं महत्व दोन वर्षांत कोरोना आजाराने पटवून दिले आहे त्यासाठी पावसाळ्यात वृक्षारोपण करून ती झाडं जगवली पाहिजे म्हणजे पावसाळ्यातील प्रजण्यमाण वाढेल, जमिनीची धूप कमी होईल आणि शुद्ध हवा मिळेल हा संदेश आपल्या परिसरामध्ये पोचला पाहिजे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार,प्रा ए पी पाटील सर हे उपस्थित होते सुत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी केले तर आभार सुभाष कामडी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा डॉ सुधा खराटे, एम पी मोरे, संतोष ठाकूर , प्रयत्न केले

लेखकाबद्दल

सुभाष कामडी

एक टिप्पणी द्या