[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दुगाव सोसायटीच्या चेअरमनपदी समता परिषदेचे सतिश सोनवणे यांची बिनविरोध निवड

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड। (प्रतिनिधी ): – दुगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन व व्हा.चेअरमन निवडणूक घेण्यात आली. यावेळी दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने सदर निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. नाशिक जिल्हा समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस व पालकमंत्री ना.भुजबळ साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असणारे व चांदवड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मधुकर अण्णा सोनवणे यांच्या घराण्यातील राजकीय वारसा असणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे

सतिश दिनकरराव सोनवणे यांची चेअरमनपदी वर्णी लागली आहे


तर व्हा . चेअरमनपदी भगवान कारभारी मंडलीक यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी चांदवड श्नी.सचिन खैरनार यांनी कामकाज पाहिले.
चेअरमन व व्हा.चेअरमन निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सभेस सोसायटी
संचालक त्र्यंबक केंदु सोनवणे , दत्तात्रय लक्ष्मण आहेर , एकनाथ राधू सोमवणे ,नारायण पंडित सोनवणे, शशीकांत अंबादास गांगुडे ,शंकर नवशिराम सोनवणे , आरीफ सत्तार शेख, केदु हरी खरात , सौ. रत्नाबाई रंगनाथ सोनवणे, सौ. लताबाई मच्छिंद्र गायकवाड ,कांतीलाल भीमराज जाधव हे संचालक उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला. फटाके फोडून व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी सरपंच संजय गांधी ,माजी पंचायत समिती उपसभापती यु.के. आहेर ,विद्यमान सरपंच आरतीताई सोनवणे , प्रख्यात व्यापारी देवीदासशेठ सोनवणे , तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, चेतनभाऊ सोनवणे, मज्जीदतात्या शेख ,ज्ञानेश्वर सोनवणे , राजेंद्र क्षिरसागर ( पंत) , प्रकाश मंडलीक ,रंगनाथ तात्या सोनवणे , मच्छिंद्र गायकवाड, बापूभाऊ तांबे , रत्नाकर गांगुर्डे,
दीपक सोनवणे ,राजेंद्र सोनवणे, माणिक क्षिरसागर ,साहेबराव आहेर , दशरथ गायकवाड आदी उपस्थित होते .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या