[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

सर्वांनी साथ दिल्यानेच काम करणे सोपे झाले. — विठ्ठल आण्णा शेलार

यांनी लिहिलेले नारायण गुंजाळ

गांवोगांवी प्रसंगोपात कार्यक्रमा निमित्त दशक्रिया,श्राध्द व सप्ताह प्रवचन करतांना एक उणीव,कुठेतरी मनाला खंत वाटायची आपणच जर व्यासपीठ बनऊन उपलब्ध करुन दिले तर,कारण महाराज मंडळी प्रवचन करतांना श्री.ज्ञानेश्वरी ग्रंथ मांडीवर घेऊन वाचन करत होते,म्हणुन संकल्प केला की आपण स्वखर्चाने शंभर गांवांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ.
– वारकरी भुषण पुरस्कार प्राप्त ह.भ.प. विठ्ठल आण्णा शेलार विखरणीकर तालुकाध्यक्ष-वारकरी महामंडळ येवला.

 

वारकरी भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल विठ्ठल आण्णा शेलार यांचा सत्कार

आडगांव रेपाळ ( वार्ताहर ) : – धार्मिक कार्यात आपण सर्वांनी साथ दिल्यानेच तीर्थयात्रा व सप्ताह सुरू करणे आदी काम करणे सोपे झाले, अस स्पष्ट प्रतिपादन ह.भ.प. विठ्ठल अण्णा शेलार यांनी आडगांव रेपाळ येथे माऊली भजनी मंडळ व ग्रामस्थांतर्फे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी केले. सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय वारकरी भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल विठ्ठल आण्णा शेलार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे तालुका संघटक ह.भ.प. सुभाष महाराज बोराडे पाटोदकर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह. भ. प. शिवाजी महाराज गायके यांनी केले. गावातील धार्मीक कार्यात राजकारण न आणता एकोप्याने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले,यावेळी बोलतांना शेलार पुढे म्हणाले कि,गावोगांवी अखंड हरिनाम सप्ताह सुरूच होते, आम्ही फक्त त्या ठिकाणी जाऊन समाजप्रबोधन करण्याचे काम केले. देशांर्तगत तिर्थयात्रा आयोजित करतांना समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. वारकरी महामंडळाचे माध्यमातून वारकरी संघटन मजबुत करुन सर्वाना बरोबर घेऊन काम केले तसेच सर्व वारकरी बांधवांनी वेळोवेळी सहकार्य केले,त्यामुळे सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय ‘वारकरी भुषण’ पुरस्कारासाठी मानांकन मिळाले व तो माझ्या सारख्या सामान्य माणसाला मिळाला ,असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी अंबादास महाराज जगताप आडगांवकर यांनी आपल्या भाषणांत शेलार यांच्या कार्याचा गुण गौरव केला , ते यावेळी म्हणाले कि परिसरातील दानशूर व्यक्तीमत्व असलेले विठ्ठल अण्णा शेलार यांचे तर्फे १०० गांवाना विविध धार्मिक कार्यक्रमासाठी व्यासपीठ वाटप करण्यात आले असुन हा स्तुत्य उपक्रम आहे.असेच अनेक कामे शेलार यांनी केले,
धार्मिक व समाजोपयोगी कार्य करून वारकऱ्यांची संघटन शक्ती अजुन वाढवावी असे हभप जगताप महाराज आडगांवकर म्हणाले. यावेळी ग्रामस्थतांतर्फे विठ्ठल अण्णा शेलार यांचा सत्कार सरपंच तुकाराम गुंजाळ व हरिभक्त परायण अंबादास महाराज जगताप यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास नारायण महाराज काळे कानडीकर, बाळासाहेब शेटे,कौतिक पगार , ह.भ.प. जगताप महाराज आडगांवकर, शिवाजी महाराज गायके, वसंत शेळके,बळवंत गायके,गंगाधर बागुल, फकिरा निकम, चेअरमन रावसाहेब बढे,मा. सरपंच नारायण गुंजाळ वामनराव जगताप,पांडुरंग गायके, सुभाष तनपुरे,गोरख तनपुरे , दत्तु गायके, रामचंद्र तनपुरे, आनंदा महाले, भागुजी महाले, यशवंत तनपुरे,जनार्दन महाले, मोहन महाले,सुरेश बढे,रमेश निकम ,गोरख जगताप,जगन तनपुरे ,गोरख गायके,भास्कर गुंजाळ, मोतीराम निकम ,भाऊसाहेब निकम, संपत बागुल, महेश महाले, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह. भ. प. शिवाजी महाराज गायके ,आयोजन ह.भ.प. दत्तु गायके ,नियोजन नारायण गुंजाळ ,सुत्रसंचालन सुरेश बढे, आभार ह.भ.प. जगताप महाराज यांनी मानले.

लेखकाबद्दल

नारायण गुंजाळ

एक टिप्पणी द्या