[masterslider id="2"]
जाहिरात विशेष लेख

संघर्षातून निर्माण झालेले कर्तृत्ववान , झुंजार नेतृत्व जनसेवक डॉ . आत्माराम कुंभार्डे

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

वाढदिवस विशेष

चांदवड व देवळा तालुक्यातील जनतेच्या सुख – दुःखात सहभागी होणारे , स्वच्छ व पारदर्शी कामाचा आग्रह धरणारे , आबालवृद्ध व तरुणांच्या अडीअडचणी सोडविणारे व सुशिक्षित नेतृत्व म्हणजे , डॉ . आत्माराम पोपटराव कुंभार्डे .

डॉ . कुंभार्डे यांनी १ ९९ ६ मध्ये चांदवड शहरात आशीर्वाद हॉस्पिटलचा शुभारंभ करून आरोग्यसेवेला सुरवात केली . त्यातूनच मित्रपरिवाराचा आग्रह व जनसेवेची आवड म्हणून राजकारणात प्रवेश केला . २००५ मध्ये पन्हाळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विराजमान झाले . आरोग्यसेवेतून जनसेवा व वाढत्या लोकसंपर्कामुळे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्यासोबत २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यपदी बहुमताने निवडून आले . जि.प. च्या माध्यमातून २१ कोटींची विक्रमी कामे पूर्ण करून जिल्ह्यात अभ्यासू व उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य म्हणून नावलौकिक मिळविला . राजकारणातील त्यांचे गुरू मा . आ . शिरीषकुमार कोतवाल यांना चांदवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आणण्यात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली . त्या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होण्याची संधी थोडक्यात हुकली . तथापि , निराश न होता २००८ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी गटातून सर्वाधिक मते मिळवून प्रतिस्पर्धी पॅनलचा पराभव करण्यात डॉ . कुंभार्डे यांचा सिंहाचा वाटा होता . त्या वेळी बाजार समितीच्या सभापतिपदी संधी न मिळाल्याने नाराज न होता चांदवड तालुका राष्ट्रीय काँग्रेसची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेत पक्षसंघटनेचे कार्य जोमाने करीत तालुक्यातील काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळवून दिली . २०१३-१४च्या पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेच्या पाठबळावर मोठ्या फरकाने निवडून आले . काँग्रेस पक्षातर्फे निवडून आलेले डॉ . कुंभार्डे हे एकमेव उमेदवार होते . त्यानंतर कार्यकर्त्यांच्या वाढत्या अपेक्षा , पक्षातील अंतर्गत राजकारण , कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक व सर्वसामान्यांमध्ये होणारा अवमान या कारणांमुळे काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ . कुंभार्डे यांनी भाजपात प्रवेश करत आपल्या कार्यकर्तृत्वाने अल्पावधीत ठसा उमटवावयास सुरवात केली . भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी निश्चित असताना ऐनवेळी मतदारसंघाचा समतोल राखण्यासाठी भाजपाने उमेदवारी डॉ . राहुल आहेर यांना दिली व डॉ . कुभांर्डे यांची उमेदवारी कापली गेली . तथापि , कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व जनतेच्या विश्वासावर आपल्या ध्येयापासून मागे न हटता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली व तालुक्यातून सर्वाधिक तीस हजार मते मिळविली . तेव्हाच खऱ्या अर्थाने डॉ . कुंभार्डे यांच्यावर जनसामान्यांचा नेता म्हणून शिक्कामोर्तब झाले . त्या वेळी पराभवाने खचून न जाता ‘ पुन्हा एकदा पाठीवरती हात ठेवत फक्त लढ म्हणा … ‘ या उक्तीप्रमाणे जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झोकून दिले . त्यानंतर झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत इतिहास घडवीत डॉ . कुंभार्डे यांनी दोन माजी आमदारांच्या पॅनलला धोबीपछाड देत १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले व चेअरमनपदी विराजमान झाले . जनतेने तालुक्याच्या राजकारणातील लोकनायक म्हणून केलेली निवड सार्थ ठरवत सामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याचा त्यांनी चंग बांधला . नंतरच्या काळात तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ . राहुलदादा आहेर यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक निवडणूक डॉ . कुंभार्डे यांच्या नियोजनाने व दूरदृष्टीने भाजपाने ताब्यात घेण्याचा धडाका सुरू केला . चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रचार व नियोजनाची जबाबदारी खांद्यावर घेत बहुमताने पक्षाचे नगरसेवक निवडून आणून भाजपाचा पहिला नगराध्यक्ष बनविण्यात डॉ . कुंभार्डे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली . त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या जि . प . व पं . स . निवडणुकीत जोरदार
संघर्ष करीत काँग्रेस व रा . कॉ . आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करीत स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले व डॉ . नितीन गांगुर्डे यांना चांदवड पंचायत समितीचे सभापती करून तालुक्यात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले .   डॉ . आत्माराम कुंभार्डे यांच्यारूपाने तालुक्याला तरुण तडफदार , अभ्यासू व मतदारसंघाची जाण असलेला लोकनायक नेता मिळाला , अशी जनतेमध्ये भावना निर्माण झाली . जिल्ह्याच्या राजकारणात माजी पालकमंत्री गिरीशजी महाजन , माजी पर्यटनमंत्री . जयकुमार रावल , तत्कालीन भाजपा जिल्हाध्यक्ष श्री . दादाभाऊ जाधव यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची उमेदवारी दिली . तथापि , अवघ्या एका मताने पराभवास सामोरे जावे लागले . भाजपाने गटनेतेपदी , तसेच नियोजन समितीच्या लहान गटामध्ये सदस्य करून जिल्हा परिषदेमध्ये विविध विकास योजनांचा गरजूंपर्यंत पोचवून तालुक्यात व जिल्ह्यात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली . तालुक्यातील तळेगाव रोही जिल्हा परिषद गटातील विकासकामांसाठी एकाच वर्षात तब्बल ७ ते ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला . सध्याही कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरु असून काही पुर्ण झाली तर काहींना मंजुरी मिळाली आहे. जिल्हा नेते अद्वयआबा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा कांदा – बटाटा उत्पादक संघाचे चेअरमन व कृषी औद्योगिक संघाच्या सदस्यपदी काम करण्याची संधी मिळाली . चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी काम करत , सर्वांना सोबत घेत उत्तम प्रशासक म्हणून भूमिका निभावत चांगली बाजार समिती म्हणून नावलौकिक व शेतकऱ्यांचा विश्वास संपादित केला . भविष्यात प्रत्येक निवडणुकीत डॉ . कुंभार्डे यांना जनतेचे प्रेम व विश्वास मिळेल , असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे . कार्यकर्त्यांना मनापासून प्रेम देणारा , जीव लावणारा , गोरगरीब जनतेसाठी झगडणारा आमचा हा नेता मोठा लोकनायक व्हावा व तालुक्याचा खुंटलेला विकास , जनसामान्यांची कामे , तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न , तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न त्यांच्या हातून सुटण्यासाठी आई कुलस्वामिनी त्यांना उदंड आयुष्य सामर्थ्य देवो ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांची परमेश्वराकडे अपेक्षा ! हे सर्व करीत असताना कुटुंबाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी सदैव पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी डॉ . सौ . शिल्पाताई कुंभार्डे यांचीही प्रचंड मेहनत आहे . शिल्पाताई नुकत्याच चांदवड मर्चंट बँकेच्या संचालकपदी निवडणूक आल्या आहेत.
आमच्या या जनमान्य , जनसेवक , लोकनायकास भविष्यातील निरामयी व यशस्वी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा ! संघर्षातून निर्माण झालेले कर्तृत्ववान , झुंजार नेतृत्व डॉ . आत्माराम कुंभार्डे

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या