चांदवड – चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रह्माचर्याश्रम संचलीत श्री एच. एच. जे. बी. पॉलिटेक्निक अंतर्गत ड्रेस डिझायनिंग आणि इंटेरियर विभागातर्फे प्रदर्शन आयोजित केलेल्या एक दिवसीय कला प्रदर्शनाचे उद्घाटन ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्ष रिंकू कासलीवाल, जयश्री कोकणे व प्राचार्य डॉ.व्ही.ए.वानखेडे,उपप्राचार्य गौडा सर, सर्व विभाग प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी विद्यार्थिनींनी बनवलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू व गारमेंट्स ज्वेलरी,आर्ट पीसेस, शोभेच्या वस्तू, ॲसेसरीज,वन पीस घागरा, कुर्ता ,कुर्ती ,बेबी फ्रॉक ,वॉल हँगिंग ,टी-शर्ट ,ब्लाउज ,स्कर्ट अश्या एक ना-अनेक प्रकारच्या वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात आले. होते यामध्ये 102 विद्यार्थिनींचा सहभाग या प्रदर्शनासाठी लाभला असून त्यांनी स्वतः वस्तू बनवून प्रदर्शित केल्या आहेत यासाठी पाच ते सहा दिवसा अगोदर पासून वस्तू बनविण्याची तयारी केली होती. त्यांना दोन्ही विभागातील प्राध्यापिका उर्मिला काळे,पी. डी. सूर्यवंशी, यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात आला. यात अनेक विद्यार्थिनीच्या वस्तूंची विक्री झाली असून आणि काही वस्तूंची ऑर्डरही स्वीकारण्यात आल्यामुळे विद्यार्थिनींना स्वावलंबी होण्यास मदत झाली.
विश्वस्त समितीचे अध्यक्ष बे बेबिलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष दिनेश लोढा, मानद सचिव जवाहरलालजी आवड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित कुमार सुराणा, उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनचे समन्वयक अरविंद कुमार भन्साळी, सह मानत सचिव झुंबरलाल भंडारी व तंत्रनिकेतनचे मुख्य समन्वयक तथा प्रबन्ध समिति सदस्य राजेंद्र कुमार बंब यांनी या आयोजनाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शभेच्छा दिल्या.तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या पंतप्रधान यांच्या संक्पनेतील मेक इन इंडिया च्या धरतीवर आपण आपल्या स्वबळावर आपला बिजनेस कसा उभारू शकतो यासाठी आज महविद्यालयामध्ये शिकताशिकता का होईना आपली ओळख जगाला पटवून दिली आहे.
या उपक्रमातून झालेल्या सुरुवातीस अनेक नागरिकांनी परिसरातील व्यक्तींनी भेट देऊन यांचा उस्फुर्त प्रतिसाद दिला व विद्यार्थिनींचा आनंद द्विगुणित केला यावेळी के.एस. सोनवणे,पी.बी.सैनी,व्ही. एन.पहाडे , पी.एस. धोंडगे, ए.ए.गिरी तसेच शालेय शिक्षक शिक्षिका व कर्मचारी हे उपस्थिती होते.

