[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

उसवाड सोसायटीच्या सर्व जागा जिंकत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांची प्रथमच सहकार क्षेत्रात एंट्री

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुक्यातील उसवाड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. ता.चांदवड या सोसायटीच्या सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व चांदवड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड व खरेदी विक्री संघाचे मा.चेअरमन व चांदवड कुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अशोकदादा गायकवाड यांच्या शेतकरी विकास पँनलने सर्व जागा जिंकून सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

सोसायटीच्या विजयाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ सयाजीराव गायकवाड यांनी प्रथमच सहकारात पाऊल ठेवले असुन त्यांच्या एंन्ट्रीने आगामी बाजार समितीच्या निवडणुकीत रंगत वाढणार आहे.यापूर्वी मराठा विद्या प्रसारक समाज संस्था व जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी कामाचा दांडगा अनुभव असणारे डॉ. गायकवाड हे सहकार क्षेत्रातील निवडणुकीत स्वतः मात्र अद्याप उतरलेले नव्हते. उसवाड सोसायटीच्या माध्यमातून प्रथमच त्यांनी सहकार क्षेत्रात प्रवेश केला आहे.

सोसायटीच्या अर्जदार गटात गायकवाड अशोक नारायण (207),गायकवाड रावसाहेब एकनाथ(184),पवार माधव गंगाधर(197),पवार सुभाष माधव(207),बच्छाव अंबादास केदू(194),बिडगर जयप्रकाश बाबुराव(200),बिडगर जिजाबाई केदू(192),शिंदे भाऊसाहेब चिंधु(202), ओ.बी.सी.गटात गायकवाड सजाजी नारायण (216),एन.टी.गटात बिडगर जिभाऊ गंगाधर(192), अनुसूचित जाती जमाती गटात बटाव कल्पना संजय(211), महिला प्रतिनिधी म्हणून गायकवाड मंगलाताई जगन्नाथ ( 204), पवार लिलावती मधुकर(205) हे यथोचितरित्या निवडून आलेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चांदवडचे सहकार अधिकारी ( द्वि.श्रे. ) श्री.नितीन पाटील यांनी कामकाज पाहिले. तर त्यांना सहाय्य सहाय्यक निवडणूक अधिकारी संस्थेचे सचिव श्री. विजय गायकवाड यांनी केले.विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या