[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

दि चांदवड मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी ॲड . श्री नरेंद्र धनालाल कासलीवाल , व व्हा . चेअरमनपदी श्री . सईद अहमद खलील अह . शेख [ गुल्लुभाई ] यांची बिनविरोध निवड

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

दि चांदवड मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी ॲड . श्री नरेंद्र धनालाल कासलीवाल , व व्हा . चेअरमनपदी श्री . सईद अहमद खलील अह . शेख [ गुल्लुभाई ] यांची बिनविरोध निवड

चांदवड तालुक्यात सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या दि चांदवड मर्चंटस को – ऑप बँकेच्या चेअरमन , व्हा . चेअरमन पदासाठी दि . ०१/०५/२०२२ रोजी नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा श्री . पी . एस . पाटोळे अध्यासी अधिकारी तथा सहा . निबंधक सहकारी संस्था , चांदवड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . चेअरमन पदासाठी अॅड . श्री . नरेंद्र धनालाल कासलीवाल यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता . तसेच व्हा . चेअरमन पदासाठी श्री . सईद अहमद खलील अह . शेख [ गुल्लुभाई ] यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता . मुदतीत इतर कोणीही अर्ज दाखल न केल्याने अॅड श्री . नरेंद्र धनालाल कासलीवाल यांची चेअरमन पदासाठी तसेच श्री . सईद अहमद खलील अह . शेख [ गुल्लुभाई ] यांची व्हा . चेअरमन पदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे ● अध्यासी अधिकारी यांनी जाहिर केले . सदर निवडणुकीचे कामकाजासाठी सहा अध्यासी अधिकारी श्री . नितीन पाटील यांनी कामकाज बघितले . नविन पदाधिका – यांनी पदग्रहण केलेनंतर बँकेचे नुतन चेअरमन अॅड श्री . नरेंद्र धनालाल कासलीवाल तसेच व्हा . चेअरमन श्री . सईद अहमद खलील अह . शेख गुल्लुभाई यांचा सत्कार बँकेचे मार्गदर्शक मा . आ . श्री . शिरीषकुमारजी कोतवाल यांचे हस्ते करण्यात आला . या प्रसंगी बँकेचे संचालक श्री सुनिलतात्या कबाडे यांनी नवनिर्वाचित पदाधिका – यांचे अभिनंदन करून पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या . नवनिर्वाचित चेअरमन अॅड श्री . नरेंद्र धनालाल कासलीवाल व व्हा चेअरमन श्री . सईद अहमद खलील अह . शेख [ गुल्लुभाई ] यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून बँकेच्या अधिकाधिक प्रगतीसाठी आम्ही आणि संचालक मंडळ कटीबध्द आहोत असे नमूद केले . बँकेचा शाखाविस्तार , एटीएम इ . सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याचा मानस व्यक्त केला . तसेच बँकेची कर्जप्रणाली अधिकाधिक सुलभ करून थकबाकी वसुलीसाठी व बँकेचे अधिकाधिक प्रगतीसाठी सर्व संचालकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन सर्व संचालकांना केले . यावेळी बँकेचे मार्गदर्शक मा . आ . श्री . शिरीषकुमारजी कोतवाल , तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ . आत्मारामजी कुंभार्डे , संचालक श्री . अशोक धोंडु व्यवहारे , श्री . राजकुमार चंपालाल संकलेचा , अॅड श्री . भुषण गोपालकृष्ण पलोड , श्री . सुनिल त्र्यंबक कबाडे , श्री . जाकीर गफ्फार शहा , श्री . सुदेश शंकर खैरे , श्री . दत्तात्रय वसंतराव राऊत , श्री . भिकचंद दत्तात्रय व्यवहारे , श्री . राहुल शिरीषकुमार कोतवाल , श्री . आदित्य अशोक फलके , श्री . वाहीदखान सुल्तानखान पठाण , श्री . महेंद्र भिकचंद गांधीमुथा , श्री . जाहीद इश्तियाक शेख , श्रीमती . भारती अशोक देशमुख , सौ . पुष्पा राजेंद्र बिरार , डॉ . सौ . शिल्पा आत्माराम कुंभार्डे , तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . सचिन सुर्यवंशी , व सर्व कर्मचारी वृंद तसेच श्री . बद्रीनारायण जाधव श्री . प्रविणशेठ हेडा , श्री . सचिन कोतवाल , श्री . दिपकशेठ व्यवहारे , श्री विजय क्षत्रिय , डॉ . जिवन देशमुख , श्री . रमेशशेठ जाधव , अंकुर कासलीवाल , धिरज संकलेचा , तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक , व्यापारीवर्ग बहुसंख्येने आदि उपस्थित होते .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या