[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

गत तीन वर्षात दरेगाव सोसायटी सलग दोन वर्षे शंभर टक्के एकविस लाख रुपये नफा

यांनी लिहिलेले पत्रकार किशोर निकम

गत तीन वर्षात दरेगाव सोसायटी सलग दोन वर्षे शंभर टक्के एकविस लाख रुपये नफा

चांदवड
चांदवड तालुक्यातील दरेगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेने जिल्हा बँकेच्या निमोण शाखेअंतर्गत असणाऱ्या संस्थांच्या तुलनात्मक दुष्टया सर्वोत्तम कामगिरी करीत अनेक वर्षांपासून तोट्यात असणाऱ्या संस्थने सलग दोन वर्षात शंभर टक्के वसुलीचा मान मिळविला असुन ३१मार्च २०२१ अखेर संस्थेला २१ लाख ३५ हजार इतका नफा झाला आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन विक्रम देवरे यांनी संस्थेचा पदभार सोडण्यापूर्वी दिली आहे.
दरेगाव विविध कार्यकारी सेवा सह.संस्था गेल्या काही वर्षांपासून सतत थकबाकित होती. मात्र मागील आर्थिक वर्षात व या वर्षी सलग दोन वर्षात संस्था बँकपातळीवर शंभर टक्के झाली आहे. सध्या संस्थेकडे ४२ लाख ५८ हजार ईतके भागभांडवल आहे.चालू व इतर तोटा शुन्य टक्के आहे. संस्थेचे जिल्हा बँकेत१७ लाख ३०हजार १७ रूपये इतकी शिल्लक आहे. संस्थेचे सभासदांकडून ४२ लाख ९७ हजार ७२५ रूपये इतकी मुद्ल कर्ज येणे बाकी आहे. संस्थेने सर्व देणी फेडत नफ्याकडे वाटचाल सुरु केली आहे.सोसायटी नफ्यात आणण्यासाठी संस्थेचे सचिव बी.एस.व्हडगर, उपसभापती नामदेव पगार ,,संचालक दगु पाटील देवरे,संजय गांगुर्डे, माधवराव देवरे,बारकु देवरे, किरण गांगुर्डे, संदिप देवरे,राघो अहिरे, दिनेश पगार, परिगाबाई गांगुर्डे, सुनीता जाधव, यांच्याबरोबर लिपिक महेंद्र गांगुर्डे , जिल्हा बँकेचे बँक इन्स्पेक्टर दुगाव, निमोण शाखेचे शाखा व्यवस्थापक व बँक कर्मचारी व गावातील सभासदांचे योगदान लाभले असल्याचे विक्रम देवरे यांनी सांगितले आहे .

लेखकाबद्दल

पत्रकार किशोर निकम

एक टिप्पणी द्या