[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

रेडगांव विविध कार्यकारी सोसायटीच्या सभापतीपदी पं.स. माजी सभापती अनिल रामकृष्ण काळे

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

रेडगांव विविध कार्यकारी सोसायटीच्या सभापतीपदी पं.स. माजी सभापती अनिल रामकृष्ण काळे

रेडगांव ता. चांदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सभापतीपदी पं.स. माजी सभापती अनिल रामकृष्ण काळे यांची, तर उपसभापतीपदी हरीभाऊ राधाजी काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुतन सभापती, उपसभापती निवडीसाठी सोसायटी कार्यालयात विशेष बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती पदासाठी अनिल काळे यांचा,तर उपसभापती पदासाठी हरीभाऊ काळे यांचा प्रत्येकी एकेक अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनील आढाव यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडणूक कामी सचिव राजेंद्र सोनवणे यांनी सहाय्य केले.
यावेळी सदस्य विजयराम काळे,सुधाकर काळे, उत्तम काळे,शंकर काळे,सुनील काळे, रामेश्वर काळे,रावबा काळे,ताराबाई काळे,इंदुबाई काळे,काशिनाथ गरुड यांसह रविंद्र काळे,संजय काळे,ज्ञानेश्वर काळे,उत्तम काळे,विलास काळे,अरुण काळे शिवराम काळे कैलास कोतवाल उपस्थित होते. निवडणुकीसाठी सर्व सदस्य फेटे बांधून आले होते. यावेळी सर्वांचा सत्कार करण्यात आला.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या