जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भयाळे येथील मुख्याध्यापक आयु. सूर्यकांत कचरु गरुड यांची 33 वर्ष सेवा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांचा वडाळीभोई केंद्राच्या वतीने गोरक्षनाथ मंगल कार्यालय धोडंबे येथे सत्कार करण्यात आला .
सदरच्या निरोप समारंभात अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख मा. श्री सर्जेराव ठोके यांनी स्वीकारले. प्रमुख अतिथी म्हणून चांदवड पं.स. शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री आर. एन . निकम व शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री वसंतराव खैरनार साहेब मा. श्री दादासाहेब पठाडे व सामाजिक कार्यकर्ते श्री अण्णासाहेब शिंदे हे उपस्थिती होते . कार्यक्रमासाठी मा. श्री सी. एम.थोरात , वाल्मीक कापडणे ,
सौ मनिषा कापडणे, कौतिक गांगुर्डे, विश्वनाथ गांगुर्डे , संजय पगार, बाळासाहेब चंदन ,शंकर एळिंजे , बबनराव खेमनार ,बापू सोनवणे , भीमाआप्पा शिंदे , दत्तू जगताप , चांडे सर , विक्रम देवरे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक केंद्रप्रमुख सोमनाथ पवार यांनी केले मा. श्री निकम साहेब , श्री खैरनार साहेब ,श्री दादा पाटील सर , श्री धोंडू जाधव , सौ. मनिषा पगार , सौ संगीत जाधव, सौ संगीता गरुड , श्री भदाणे सर , सौ कुंभारकर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री रमेश आहेर यांनी केले . निरोप समारंभ यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व ग्रेड पात्र मुख्याध्यापक , पदवीधर शिक्षक व शिक्षक बंधू भगिनिंनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी सुर्यकांत गरुड यांनी सेवाकाळातील केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल उपस्थितांनी मनोगते व्यक्त केली. तर अनेकांनी त्यांचा सत्कार केला.

