[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

कांदा चाळीसाठी सातहजार रुपयांऐवजी तेराहजार रूपये प्रतीटन अनुदान वाढवून देण्याची कुषीमंत्र्यांकडे चांदवड तालुका शिवसेनेची मागणी

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

कांदा चाळ अनुदान रक्कम वाढून मिळणे बाबत राज्याचे कुषीमंत्री दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन चांदवड तालुका शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
चांदवड तालुक्यातील कांदा पिक हे प्रमुख पिक असून हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते . व कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हे खूप गरजेचे झाले असून कांदा चाळ या घटकाचे अनुदान खूप कमी आहे . तरी कांदा चाळ अनुदान वाढवून मिळाल्यास सर्वसामान्य शेतकरी वर्गाला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल . कांदा चाळ या घटकास 10 ते 12 वर्षाच्या अगोदर पासून प्रत्येक लाभार्थीस रु . 87500 / – इतके अनुदान मिळत असून हे अनुदान कांदा चाळ बांधण्यास अत्यल्प असून कांदा चाळ ह्या घटकास 90 % काम हे स्टील वर आधारीत असल्या कारणाने या कामात मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्यामुळे कांदा चाळ शेतकरी हे काम करण्यास शेतकऱ्यास परवडत नसुन शेतकरी कांदाचाळ बांधकाम करण्यास इच्छुक नसल्याने केंद्र सरकारच्या 2021/22 च्या एस . एस . आर . रेट व्हावे . जर राज्य सरकारच्या 2013/14 च्या दरानुसार अनुदान हे 7000 / – रू प्रतिटन एस . एस . आर . असून राज्य सरकार 50 % म्हणजे 3500 रू . टन अनुदान देते हे अनुदान व्यवहार्य नसून जिल्ह्यातील कांदा घटकामध्ये काम करणाऱ्यांची मागणी आहे की कांदा चाळीसाठी केंद्राच्या सार्वजनिक बांधकाम रेट नुसार 13000 / – रू . दर ग्राह्य एफ.पी.सी ची मागणी अशी धरावा अथवा स्मार्टच्या निकषानुसार 60 % सबसिडी मिळावी . अशी मागणी निवेदनाद्वारे कुषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे समक्ष भेट घेऊन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर ,तालुकाप्रमुख विलास भवर बहादुरीचे सरपंच बापू शिरसाट,शामभाऊ शिरसाट, शांताराम शिरसाट यांनी केली आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या