नांदगाव तालुक्यातील नागापूर येथे सरपंच ताराबाई दगु पवार ,राजेंद्र वाल्मिक पवार ,रघुनाथ सोमासे, सुधाकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जय नागेश्वर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी विशाल राजेंद्र पवार तर व्हा . चेअरमनपदी भिमराज गंगाधर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
तसेच नागापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रल्हाद पुंजा पवार , व्हा . चेअरमनपदी रंजना भास्कर सोमासे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने दोन्ही सहकारी संस्थांवर मनमाड बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र वाल्मिक पवार यांचे वर्चस्व असल्याचे सिध्द झाले आहे . नागेश्वर वि . का . सोसायटीच्या सर्व 13 जागांवर बिनविरोध निवड करण्यात आली .
त्यानंतर चेअरमनपदी विशाल पवार व व्हा . चेअरमनपदी भिमराज पवार यांची निवड बिनविरोध झाल्याने फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे निवडीचे स्वागत करण्यात आले .तसेच नागापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअमरनपदी प्रल्हाद पवार , व्हा . चेअरमनपदी रंजना सोमासे यांची निवड करण्यात आली असून या संस्थेवर राजेंद्र वाल्मिक पवार यांच्या गटाला नऊ जागांवर विजय संपादन करता आला .
त्यामुळे या दोन्ही संस्थावर त्यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे . यावेळी जय नागेश्वर संस्थेचे नवनिर्वाचित संचालक सखाहरी कदम ,माधव पवार , बाळासाहेब पवार , अनुसयाबाई पवार , बाळासाहेब सोमासे , संजय पवार , विनित पवार , उज्वला पवार , स्नेहल पवार , उमेशचंद्र पाटील , रमेश जाधव , उपस्थित होते तर नागापूर वा.का.सेवा सोसायटीच्या निवडीप्रसंगी नागू मोरे , संतोष पवार , नागू पवार , गोविंद सोमासे , विजय बोडखे , कल्पना पवार , संतोष शिलावट हे संचालक मंडळ उपस्थित होते . नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

