आडगाव रेपाळ (वार्ताहर ):– आडगाव रेपाळ वि. का. संस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर साहेबराव तनपुरे व उपाध्यक्षपदी किसन नारायण शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आडगाव रेपाळ वि.का.संस्थेचा सन 2022 ते2027 या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता, यावेळी या संस्थेची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूकही बिनविरोध करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार अधिकारी(प्र.श्रे.) रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी संचालकांची बैठक होऊन अध्यक्षपदी ज्ञानेश्वर साहेबराव तनपुरे यांची व उपाध्यक्षपदी किसन नारायण शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षपदासाठी शरद शिंदे यांनी सुचना केली त्यास साहेबराव पगारे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी दत्तु मुरकुटे यांनी सुचना आणली तर राघु राजाराम जगताप यांनी अनुमोदन दिले.
संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एक एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध निवड झाली असल्याचे घोषित केली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष , उपाध्यक्ष व संचालक यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी सभेस माजी अध्यक्ष रावसाहेब बढे, संचालक राघू जगताप, रावसाहेब महाले,अशोक माने, हरिभाऊ शिंदे ,निवृत्ती गायके, दतु मुरकुटे, शरद शिंदे ,बबन कवडे ,साहेबराव पगारे ,शैला गुंजाळ ,सुनिता पानसरे सचिव लहानु धांद्रे नारायण गुंजाळ, चांगदेव तनपुरे, भाउसाहेब तनपुरे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


अध्यक्षपदासाठी शरद शिंदे यांनी सुचना केली त्यास साहेबराव पगारे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी दत्तु मुरकुटे यांनी सुचना आणली तर राघु राजाराम जगताप यांनी अनुमोदन दिले.