[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

बिनविरोध निवडीची परंपरा राखली जोपूळ सोसायटीने : संजय दगुजी जाधव सभापती पदी तर दीपक भिका वाघ यांची उप-सभापती पदी बिनविरोध निवड

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

बिनविरोध निवडीची परंपरा राखली जोपूळ सोसायटीने : 

संजय दगुजी जाधव सभापती पदी तर दीपक भिका वाघ यांची उप-सभापती पदी बिनविरोध निवड

 

नुकत्याच झालेल्या वि. का. सोसायटी जोपूळच्या पंचवार्षिक निवडणुकीत कॉंग्रेसच तालुकाअध्यक्ष संजय जाधव यांच्या गटाला १२ पैकी १२  जागा निवडून घवघवीत यश प्राप्त झाले होते. विरोधकांचा दारून पराभव झाल्यानंतर अनेक चर्चांना उधान आलेले होते. तालुक्याचे लक्ष असलेल्या मोजक्या गावांमध्ये जोपूळ गावचा ‘संवेदनशील’ म्हणून समावेश केला जातो.

जोपूळ सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्यावतीने चेअरमन पदावर संजय दगुजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उप सभापती पदासाठी अनेक इच्छुक असताना देखील, संचालक मंडळाची एकवाक्यता दर्शवण्यासाठी सर्वानुमते युवा सदस्य दीपक वाघ यांना कार्यभार देण्याचे मंजूर झाले.

            सलग ३५ वर्षांपासून जोपूळ सोसायटीचा कारभार कै. रामभाऊ हरी जाधव, श्री. बाळू काळू पिंपरकर, श्री. संजय दगुजी जाधव यांच्या गटाकडे होता. “चांगल्या कामाची पावती म्हणून सभासदांनी आमच्या सहकाऱ्याना कारभार चालवण्याची संधी दिली, सभापती म्हणून मी खुर्चीला न्याय देण्याचा प्रयत्न करत आलो आहे.” असे मत नवनिर्वाचित सभापती संजय जाधव यांनी व्यक्त केले. तर “निष्ठेने काम करत असताना सामान्य कार्यकर्त्याला कारभार करण्याची संधी मिळते हेच सहकाराचे खरे वैशिष्ट आहे.” असे प्रतिपादन उप-सभापती दीपक भिका वाघ यांनी आभार व्यक्त करताना केले.

नवनिर्वाचित संचालक  दत्तू पंढरीनाथ कोतवाल, अरुण देवराम जाधव, भाऊसाहेब ज्ञानेश्वर वाघ, केदू  दौलत सावकार, कैलास रामभाऊ जाधव, लक्ष्मण शंकर जाधव, बाळू हरी जाधव , सौ. अनिता धोंडीराम पिंपरकर, सौ. मीराबाई भाऊसाहेब धामणे, परशराम प्रकाश केदारे, यांनी निवड प्रक्रियेत सहभाग घेत प्रकिया पार पाडली.

या निवड प्रक्रियेत  श्री पोपट पाटोळे साहेब यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडले. यावेळी नितीन पाटील, संस्थेचे सचिव संजय ठोंबरे, लिपिक संदीप वक्ते, राहुल केदारे यांनी सहकार्य केले. यावेळी जयराम कोतवाल, पप्पू कोतवाल, कैलास सावकार, रमण हरी जाधव, पंडित जाधव, जयवंत जाधव, दत्तू दामू जाधव, संदीप लहानू जाधव, अशोक सदू जाधव, अण्णा कोतवाल, बबन पिंपरकर, मधुकर धामणे, अमोल धामणे, मोठाभाऊ वाघ, पोपट रेवजी वाघ, नंदू नामदेव वाघ, विलास जाधव, सोनू जाधव, रामदास सावकार, योगेश रघुनाथ जाधव, धोंडीराम सीताराम जाधव, त्र्यंबक  सावकार, अर्जुन जाधव, पांडुरंग जाधव, साहेबराव जाधव, सोमनाथ जाधव, प्रभाकर जाधव, भाऊसाहेब जाधव, संजय पुंडलिक जाधव, ज्ञानेश्वर  कोतवाल, गोरख कोतवाल, दिपांषु जाधव, किशोर जाधव, कचरू केदारे, सीताराम सावकार, बाळासाहेब जाधव, दादा धोंडी जाधव, उत्तम जाधव, शिवाजी जाधव , मनोहर जाधव, सुभाष जाधव, संजय सोनावणे, शिवाजी वाघ, दिगंबर कोतवाल, दादा दाते, दिलीप पिंपरकर, अमोल जाधव, अण्णा जाधव, रवींद्र केदारे, विठ्ठल गोधडे, कृष्णा केदारे, वैभव केदारे, त्र्यंबक जाधव आदींनी सहकार्य केले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या