[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

निवडणूक संपली आता विरोधही संपला : पँनलचे नेतृत्व करणारे शांताराम ठाकरे व निलेश ठाकरे यांनी केले मत प्रकट – गाव पातळीवरच्या राजकारणात वेगळा आदर्श..

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

तालुक्याचे लक्ष लागलेल्या गणूर सोसायटीची सत्ता नम्रता पॅनलकडे अकरा जागा जिंकून मिळविले बहुमत

निवडणूक संपली आता विरोधही संपला

पँनलचे नेतृत्व करणारे शांताराम ठाकरे व निलेश ठाकरे यांनी केले मत प्रकट

चांदवड :- चांदवड तालुक्यातील राजकीय धुरीनींचे लक्ष लागुन राहिलेल्या
गणूर ता. चांदवड येथील गणूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत नम्रता पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. एकूण १३ जागांसाठी ता. १५ ला पार पडलेल्या मतदानाचा सायंकाळी लगेचच निकाल जाहीर करण्यात आला. यात नम्रता पॅनलला ११ तर एकता पॅनलला २ जागांवर यश मिळाले.
नम्रता पॅनेलचे विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते अशी, ठाकरे गोरख नामदेव(२३४), ठाकरे निलेश सुकदेव (२५१), ठाकरे संतू वाळू (२११), ठाकरे हरिश्चंद्र गौबा (२६०), पटेल अशपाक बशीर (१८६), पटेल यासिन नजीर (१९३), शिंदे रामकीसन पंढरीनाथ (२०९), सवंद्रे अलका माणिक (२४०), ठाकरे शांताराम दगु (२३०), गांगुर्डे साहेबराव भीमा( २९२), सोनवणे बाळू विठ्ठल(३३९). एकता पॅनलचे विजयी उमेदवार ठाकरे दुर्गाबाई बाळू (१८३), ठाकरे दिनकर रामभाऊ (१९०).
दरम्यान एकूण ४५४ मतदारांपैकी ४१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ६ वाजता निकाल लागताचं नम्रता पॅनलच्या उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करत मिरवणूक काढत एकच जल्लोष केला.

विजयी सभेत नम्रता पॅनलचे नेतृत्व करणारे निलेश ठाकरे व शांताराम ठाकरे यांनी निवडणूक संपली आता विरोधही संपला सोसायटीच्या प्रगतीसाठी सर्वांमिळून एकदिलाने काम करू असे मत प्रकट केले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

 

🙏 जाहीर आभार🙏

गणुर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित गणुर या संस्थेच्या व्यवस्थापन समिती पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपण तसेच सोसायटीच्या सभासदांनी व गणुर ग्रामस्थांनी नम्रता पॅनलच्या सर्व उमेदवारांवर जो विश्वास दाखवून नम्रता पॅनलला दणदणीत विजय मिळवून दिला त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे गणूर ग्रामस्थांचे व नम्रता पॅनलच्या सर्व हितचिंतकांचे मनापासून जाहीर आभार आपण आमच्यावर जो विश्वास दाखवला तो निश्चितचपणे आम्ही सार्थ ठरवू अशी ग्वाही देतो पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद
आपला नम्र

सीए शांताराम ठाकरे

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या