शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची पारेगाव येथील बालसंस्कार शिबिराला भेट
चांदवड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या पारेगाव येथील महर्षी पराशर आश्रमात सुरू असलेल्या वारकरी संप्रदाय बालसंस्कार शिबिराला आवर्जून भेट दिली. या शिबिरात विविध भागातून जवळ जवळ १३० विद्यार्थी सहभागी झालेले आहेत.
लहानपणापासून घरात बाहेर कसं राहायचं, त्याचबरोबर स्वतःचे काम स्वतः कसे करायचे, वारकरी श्लोक, वारकरी संप्रदायाचे अभंग, संस्कार अश्या विविध गोष्टी या विद्यार्थ्यांना या शिबिरात मार्फत शिकवले जातात.
या शिबिरातील सर्व महाराजांचे आभार व्यक्त केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
या प्रसंगी शिबिराचे सर्व आयोजक , सौरभ महाराज जाधव, योगेश महाराज जाधव, अभिजित महाराज देशमुख, सुनील पाटील ग्रामीण जिल्हाप्रमुख, भारती ताई जाधव ग्रामीण जिल्हाप्रमुख महिला आघाडी, विलास भवर तालुकाप्रमुख चांदवड, तालुका संघटक केशव ठाकरे, सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

