[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता

दिगंबर आप्पा कबाडे यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा उत्साहाने साजरा

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

दिगंबर आप्पा कबाडे यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा उत्साहाने साजरा

चांदवड:  चांदवड येथील मा.श्री दिगंबर आप्पा (भगवानशेठ) आप्पाजी कबाडे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा उत्सहात संपन्न झाला.

चांदवड येथील मा.श्री दिगंबर आप्पा (भगवानशेठ) आप्पाजी कबाडे हे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड माजी संचालक होते. चांदवड मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्हाईस चेअरमन, चांदवड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य,
वडांगळीकर स्वामी ट्रस्ट विश्वस्त श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट विश्वस्त अशा विविध प्रकारच्या संस्थांवर त्यांनी कामकाज केलेली आहे.

त्यांचा ७५ वा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा दिनांक १ जुन रोजी चंद्रेश्वर गढ येथे उस्ताहात साजरा करण्यात आला, या प्रंसगी चंद्रेश्वर संस्थानचे अध्यक्ष महामंडलेश्वर मंहत जयदेवपुरीजी महाराज, महामंडेलेश्वर वडांगळीकर महाराज , माजी आमदार श्री शिरीषकुमार कोतवाल,माजी नगराध्यक्ष श्री भुषण भैय्या कासलीवाल, नाशिक चे प्रसिद्ध व्यापारी श्री संदेश शेठ कासलीवाल, चामको बँक चेअरमन श्री नंदुकाका कासलीवाल, संचालक शंभु खैरे, सुनिलतात्या कबाडे, संजय शेळके, रौनक कबाडे, कबाडे परिवारातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच चांदवड शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या