महात्मा फुले विद्यालय दुगाव येथे कै. रा. तु. वाघ (दहिवडकर) यांना प्रथम पुण्यस्मरणार्थ श्रद्धांजली
कै. राजाराम तुळशीराम वाघ (दहिवडकर) यांनी महात्मा फुले शिक्षण संस्था दुगाव येथे 11 वर्ग खोल्याची भव्य इमारत बांधण्यासाठी आर्थिक निधी दान स्वरूपात दिला होता. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ श्रद्धांजली कार्यक्रम विद्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. सोनवणे बी. एन सर, उपाध्यक्ष प्रकाश भिकाजी सोनवणे,
चेअरमन विनायकभाऊ सोनवणे, सेक्रेटरी सोनवणे जे. एस. माजी सेक्रेटरी गोकुळ पंडित सोनवणे, सर्व संचालक मंडळ, जगुनाना, मुख्याध्यापक मोरे ए.एस, गणेश जाधव, व्ही.टी.सर, व्हि.के.सर , भानुदास सर, मंडलिक एच. एस.
सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आहेर यु के सर यांनी केले .

