[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या हेल्थ

चांदवड परीक्षेत्रात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम तसेच प्लास्टिक मुक्त परिसराचा कार्यक्रम संपन्न

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड परीक्षेत्रात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम तसेच प्लास्टिक मुक्त परिसराचा कार्यक्रम संपन्न

चांदवड दिनांक ०५ जून २०२२ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी चांदवड प्रादे यांचे अध्येक्षते खाली चंद्रेश्वर परीक्षेत्रात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम तसेच प्लास्टिक मुक्त परिसराचा कार्यक्रम घेण्यात आला . त्यानिमित्य चांदवड येथील माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल , सचिन निकम माजी सरपंच राहूड , दिलीप हांडगे , सत्यवान गायकवाड चांदवड नगरपरिषद स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग , भाऊसाहेब चव्हाणके स्वराज्य बहुउदेशीय संस्था नाशिक व संस्थेतील इतर सदस्य नगर परिषदेतील कर्मचारी , ग्रामस्थ व वनपरिक्षेत्र चांदवड मधील वन कर्मचारी यांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला . त्याच प्रमाणे मौजे – गणूर येथे श्रीराम घाट येथे केद्राई माता फार्मर प्रोडुसर कंपनी व गणूर ग्राम पंचायत यांचे माफर्त वृक्ष लागवडीचा कार्यक्रम श्रीराम घाट येथे करण्यात आला.त्याप्रसंगी गणूरचे शांताराम ठाकरे सरपंच , सदस्य ग्रामस्थ व केंद्राई माती फार्मर प्रोडुसर कंपनीचे अनिता तिपायले ( C.A ) धनराज टेपले , शांताराम जाधव , वंदना जाधव , शुभम शिंदेसंजय आहेर , हेमंत शिंदे , गोरख आहेर , सुरेश पाटील संकेत मांदले , विशाल बरकले , राहुल ठोक इत्यादी ग्रामस्थ व वन कर्मचारी चांदवड इत्यादी हजर होते .

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या