आहुर्ली सोसायटीच्या चेअरमन पदी पुराणे, व्हा.चेअरमन पदी खातळे
ईगतपुरी – (नवनाथ गायकर )- ईगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित व राजकीय नाटयाने वादग्रस्त ठरलेल्या आहुर्ली आदिवासी विविध विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अखेर चंद्रकांत तुकाराम पुराणे यांची तर व्हा.चेअरमन पदी भास्कर निव्रुत्ती खातळे यांची निवड झाली आहे.
यापूर्वी ही निवडणूक कोरम पुर्ण न झाल्याने तहकूब झाली होती.
दरम्यान नव्याने आयोजित बैठक निवडणुक निर्णय आधिकारी व्हि.वाय.हिंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या नव्याने बोलावण्यात आलेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत सदरची निवड जाहीर करण्यात आली.
या बैठकीला नऊ पैकी पाच संचालक हजर होते.त्यात शरद रामदास कुटके, चंद्रकांत पुराणे, श्रीमती मथुराबाई काशिनाथ गायकर,भास्कर खातळे व श्रीमती नंदाबाई द्तु मेरिंदे आदींनी या निवडणुकीत सहभाग घेतला.
चेअरमन पदासाठी चंद्रकांत पुराणे व व्हा.चेअरमन पदासाठी भास्कर खातळे या दोघाचेंच एकेक अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून सचिव व्हि.सी.डोळस यांनी काम पाहिले.
निवडणूक बिनविरोध पार पडण्यासाठी मार्गदर्शक म्हणून रंगनाथ पा.खातळे, वामन महाले, विष्णु उतेकर, त्रंबक महाले, प्रकाश मालुंजकर , बहिरु कुटके व नथु कुटके आदी जेष्ठ नेत्यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी माजी सरपंच तुकाराम गायकर, गणेश खकाळे,तानाजी कुटके, तानाजी महाले, भाऊसाहेब गायकर, रामदास गायकर,गणपत महाले, निव्रुत्ती महाले, तुकाराम महादु गायकर, अशोक महाले, दत्तु खकाळे, तानाजी खातळे आदिसह असंख्य सभासद व नागरिक यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन यांच्या निवडीसाठी परिश्रम घेतले.

