[masterslider id="2"]
मुख्य बातमी राज्य विशेष लेख स्थानिक बातम्या

मुक्या प्राण्या विषय कृतज्ञतेची भावना : धोंडगव्हाणला एकोनाविस वर्षीय जामुचे निधन झाल्याने अंतिम संस्कार व दुखवटा

यांनी लिहिलेले सुरेश सलादे वडनेरभैरव

मुक्या प्राण्या विषय कृतज्ञतेची भावना

धोंडगव्हाणला एकोनाविस वर्षीय जामु चे निधन झाल्याने अंतिम संस्कार व दुखवटा

सध्या स्वतःची आई वडील हे वृद्धाश्रमात नेऊन घालणाऱ्यांची संख्या कमी नाही तर तो स्वतः जन्म दिलेल्या मुलांना रस्त्यावर फेकून देऊन किंवा अनाथ लेबल लावणारे महाभाग देखील आपल्या आजूबाजूला कमी अधिक प्रमाणात आढळतात तर दुसरीकडे एखाद्या पाळीव प्राण्याला आपल्या कुटुंबातील सभासद सदस्य असल्यासारखे जिवापाड सांभाळणारी देखील माणसं संख्येनं कमी असली तरी नक्की आपल्या आजूबाजूला आहे. वारकरी संप्रदायातील मोठं नाव म्हणजे देहू चे संत तुकाराम महाराज यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणत वन्यजीव पशुपक्षी यांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानलेल आहे असेच काही लोक आपल्या पाळीव प्राण्यांना देखील पोटच्या मुलांप्रमाणे जीव लावत सांभाळ करतात आणि जेव्हा नैसर्गिक रित्या किंवा अपघाताने त्या पाळीव प्राण्यांचे किंवा पक्षांची निधन होते तेव्हा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यासारखे अनुभव आणि अनुभूती तो परिवार घेत असतो हे सांगण्याचा उद्देश असा,

चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाण येथील विष्णू रघुनाथ चौरे या व्यक्तीने 19 वर्षांपूर्वी आपल्या गावातील राहत्या घराशेजारी असलेल्या एका कुत्र्याचे पिल्लू आपल्या शेतावर पाळण्यासाठी नीले होते स्वतः विष्णू भाऊ जरी गावात राहत होते तरी त्यांचे बंधू रमेश रघुनाथ चौरे हे मयत शेतावर राहत असं जेव्हा विष्णू वनी ते कुत्र्याचे छोटे पिल्लू मला तेव्हा रमेश रघुनाथ चौरे यांची एक छोटी मुलगी रिया नावाची त्या आणलेल्या पिला पेक्षा एक वर्षांनी मोठी होती सहाजिकच रिया आणि त्या मुलांची चांगलीच गट्टी जमली विष्णु चौरे यांनी पाळलेलं कुत्र्याचे पिल्लू हे रमेश चौरे व विष्णू चौरे त्या कुटुंबात अतिशय लाडाकोडात वाढत होते सर्व कुटुंबाचा ते सदस्य झाले होते त्याचे नाव जामु ठेवले होते एकोणवीस वर्ष या या जामु ने या परिवाराला इतका लळा लावला की प्रत्येक सुखदुःखात त्याबरोबर घरच्या संरक्षण व राखणदार म्हणून त्याच्यावर भरवशा वर घराला कडी किंवा कुलूप लावण्याची वेळ आली नाही या 19 वर्षीय जामु चे निधन आज झाल्यानंतर आपल्या घरातील व्यक्ती निधन व्हावे अशा प्रकारे या चौरे परिवारातील प्रत्येक जण हळहळला त्याच्या आठवणींमध्ये हरखून गेला कुटुंब व आजूबाजूच्या लोकांनी याप्रसंगी ज्या मुलाला दफन करीत अंतिम संस्कार पूर्ण केले

यावेळी त्यांचे अनेक नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता रिया या मुलीने सर्वात जास्त सलगी व माया त्यावर केली असल्याने तिचे दुःख काही वेगळेच होते अतिशय भावपूर्ण वातावरणात या कुत्र्याच्या शव वरती अंत्यसंस्कार करण्यात आले चौरे परिवाराच्या वतीने दुखवटा पळून पुढील सर्व धार्मिक विधी विधी केले जाणार आहे अशी माहिती विष्णू रघुनाथ चौरे यांनी दिली समाजामध्ये आजही जिथे जन्मदात्या आई वडील व जन्म दिलेल्या मुलांना सांभाळणे अवघड होते तेथे एखाद्या मुक्या प्राण्या विषय कृतज्ञतेची भावना अशाप्रकारे व्यक्त होताना दुसरे टोक सुद्धा माणुसकीचे या निमित्ताने आपल्या नजरेस पडते

लेखकाबद्दल

सुरेश सलादे वडनेरभैरव

एक टिप्पणी द्या