[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवड तालुक्यात कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

चांदवड तालुक्यात कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन

खरीप हंगाम २०२२ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी दिनांक २५ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजिवनी मोहीम राबविण्याच्या सूचना कृषि आयुक्तालयाकडून प्राप्त झालेल्या आहेत.त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कृषी संजीवनी मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी दिली आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत कृषि संजीवनी मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत तालुक्यामध्ये कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी,कृषी विभाग-जिल्हा परिषद,कृषीविद्यापीठे,कृषी विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ,कृषी मित्र हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत.कृषी तंत्रज्ञानाबद्दल छोटीशी सुधारणा देखील उत्पादनवाढीवर मोठा परिणाम करू शकते,त्यामुळे दिनांक २५ जून ते १ जुलै या कालावधीमध्ये कृषी संजीवनी मोहीम साजरी करण्यात येणार आहे.स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच १ जुलै रोजी कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप होऊन कृषी दिन साजरा केला जाणार आहे.सदर मोहिमेमध्ये प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.

१)दिनांक २५ जून २०२२ – विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार व मूल्य साखळी बळकटीकरण दिन
२) दिनांक २६ जून २०२२- पौष्टिक तृणधान्य दिवस
३) दिनांक २७जून २०२२- महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस
४)दिनांक २८ जून २०२२- खत बचत दिन (जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर)
५)दिनांक २९जून २०२२- प्रगतशील शेतकरी संवाद दिवस
६)दिनांक ३० जून २०२२- शेती पूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस
७)दिनांक १जुलै २०२२-कृषी दिन आणि कृषि संजीवनी मोहिमेचा समारोप.

 

कृषी विद्यापीठे,केंद्रीय संशोधन संस्था यांनी संशोधन केलेले अद्ययावत कृषी तंत्रज्ञान व कृषी विषयक इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवून त्याचा अवलंब प्रभावीपणे करण्यासाठी कृषि संजीवनी मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदर मोहिमेत सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.

-विलास सोनवणे,तालुका कृषि अधिकारी,चांदवड

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या