पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल गावाच्या वतीने सत्कार
चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील बळवंत रामभाऊ पगार यांना पीएसआय पदी बढती
मिळाल्याबद्दल खडक ओझर येथे ग्रामस्थांकडून भव्य सत्कार करण्यात आला
यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
पगार साहेब यांचा जीवनाचा प्रवास
नाव बळवंत रामभाऊ पगार
जन्म -एक जून 1966 खडक ओझर
1972 साली इयत्ता पहिली शाळेत गेले
1982- 83 ला दहावी पास झाले
साधारणता पाच वर्ष वडाळीभोईला पाईपाई जाणे येणे असायचे 
1983 साली चांदवडला नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित कॉलेजमध्ये ऍडमिशन फक्त तीन महिने कॉलेज करून कॉलेज सोडले
1983- 84 मध्ये लासलगाव येथे ट्रकवर /टेम्पोवर सहचालक ज्याला आपण ग्रामीण भागात किन्नर असे म्हणतो तेथे कामास
नंतर ते काम सोडून त्यांनी कादवा साखर कारखान्यात एक रुपया तासाने पोते लोटण्याचे काम ठेकेदारी पद्धतीने केले आणि सीजन संपल्यानंतर ते काम बंद केले
त्यानंतर ते नाशिक येथे गेले ठेकेदारी पद्धतीने बंगल्यावर किंवा हॉटेलवर वाचमन म्हणून वाचमनकी केली
आणि वाचमन की करत असताना एक छोटे सायकलचे दुकान त्यांनी टाकले
सायकल रिपेअर करताना सायकलचे पंचर काम रिपेरिंग त्याच बरोबर स्टोव गॅस बत्ती रिपेअर करू लागले..
त्यानंतर 1987 साली राज्य राखीव पोलीस दलात भरती झाले
1987 ते 1990 धुळे अमरावती येथे नोकरी केली. चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग ,रत्नागिरी अशा अवघड ठिकाणी त्यांनी नोकरी केली..
1990 मध्ये पोलीस अकॅडमी नाशिक येथे त्यांची बदली झाली
1990 ते 2004 पर्यंत पोलीस अकॅडमीत वाहन चालक म्हणून ते कार्यरत होते..
या दरम्यान त्यांनी दहा ते पंधरा आयपीएस अधिकाऱ्यांकडे प्रामाणिक नोकरी केली
65 बक्षिसे यांना उत्कृष्ट चालक म्हणून मिळालेले आहे
C I D, आडगाव पोलीस स्टेशन पंचवटी पोलीस स्टेशन अशा ठिकाणी त्यांनी नोकरी केली
यादरम्यान कोणाचाही रस्त्यावरती कुणाचाही एक्सीडेंट झाला तर ते कुठल्याही मदतीची वाट न पाहता स्वतः मेडिकल कॉलेज येथे घेऊन जातात अगदी पेशंटची व त्याच्या नातेवाईकाची जेवणाची व्यवस्था पण करत असतात
एकदा एक घटना अशी घडली की एका महिलेला त्यांनी उडी मारण्यापासून वाचवले त्यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी दोन हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला..
चार चार महिन्यांपूर्वी त्यांची ट्रॅफिक ला बदली झाली आणि आता पीएसआय म्हणून बढती मिळाली आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाबाजी पगार सर यांनी केले व अध्यक्षस्थान आर जी पगार सर यांनी भूषवले यावेळी उपस्थित माननीय सरपंच सौ सुरेखाताई पगार, उपसरपंच विजय पगार ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हायचेरमन केद्राई देवस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर पगार, वसंत पगार, सोमनाथ धनाईत उपस्थित होते
यावेळी गंगाधर पगार सर ,गोविंद पगार, शिवाजी पगार, नारायण पगार आदी ग्रामस्थ उपस्थित होते
हनुमान मंदिर, ग्रामपंचायत, हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा इत्यादी ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला

