[masterslider id="2"]
मुख्य बातमी संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

बोरवेल मधून उडाले तब्बल 40 फूट उंचीवर ‘जलपरी’सहित पाण्याचे फवारे.. बघून व्हाल आश्चर्यचकित.. चांदवड तालुक्यातील घटना..

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

काय तो पाण्याचा फवारा

काय ते बोअरवेल

समधी आश्चर्यचकित हाय

चांदवड तालुक्यातील चिखल आंबे येथील घटना बोरवेल मधून उडाले तब्बल 40 फूट उंचीवर जलपरीसहित पाण्याचे फवारे

चांदवड तालुक्यातील चिखलांबे या गावात रविवार दि . १७ जूलैला दुपारी दोन ते अडीचवाजेच्या सुमारास वसंत वामन आमले यांच्या शेतातील गट नं . १ ९ ५ | १ या क्षेत्रात सदर घटना घडली.

बोअरवेल मधुन अचानक जोरात पाण्याचा फवारा ३० ते ४० फूटा पर्यंत उडू लागला. यात बोअरवेल मध्ये असलेली जलपरीपंप हा पाईप सहित बाहेर फेकला गेला होता. पाण्याचा फवारा सुमारे ३० ते ४० फूटा पर्यंत उंच उडू लागला. यात बोअरवेल मध्ये असलेली जलपरी ही पाईपांसहित बाहेर फेकली गेली. पाण्याचा फवारा अंदाजे अर्ध्या तासा पर्यंत पाणी बोअरवेल मधून उडत असल्याने आश्चर्यचकित करणारे वातावरण तयार झाले. व नेमका हा प्रकार काय आहे. याबाबत विविध मतप्रवाह नागरिकांमध्ये चर्चिले गेले.

मात्र पाण्याची पातळी वाढल्याने अचानक पाणी उंच उडू लागल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.बंद वीजपंप बाहेर फेकला गेल्याने व त्या सोबत असलेला ३५० फूटा पर्यंतचे पाईप बाहेर फेकले गेल्याने आमले यांची मोठी नुकसान झाली. या प्रकारामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर देखील हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सदर घटनेसंदर्भात चिखलांबे गावचे तलाठी उदय नेहर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी केली . काय प्रकार आहे या बाबत शहानिशा केली तसेच ही माहिती चांदवड तहसीलदार प्रदिप पाटील यांनाही कळविली.

 

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या