राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस देवळा तालुका अध्यक्ष कल्पेश आहेर यांनी उपस्थित केला प्रश्न
शासनाने पुन्हा थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला पण ग्रामपंचायत सदस्यांचा महत्व काय असा प्रश्न राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष कल्पेश आहेर यांनी उपस्थित केला
मागच्या वेळी भाजपा सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला आणि त्यावेळी झालेल्या बहुतांश ग्रामपंचायत मध्ये सरपंच एका गटाचे आणि सदस्य एका गटाचे निवडून आले परिणामी दोन गटात सतत वादामुळे तालुक्यात अनेक गावांचा विकास खुंटला गेल्याचे दिसून आले जनतेतून निवडून आल्याचा दिमाख करत अनेक सरपंचांनी मनमानी पणे गावाचा कारभार करत कोणतेही निर्णय प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे सदस्यांना महत्त्व न देणे हम करे सो कायदा म्हणत स्वतः सरपंच ग्रामसेवकांच्या हाताशी धरून विकास कामाच्या नावाखाली गुत्तेदारी करून मलिदा लाटण्याचे असे प्रकार सुद्धा घडले आहे ग्रामपंचायतच्या अनेक निर्णय प्रक्रियेपासून सदस्यांना दूर ठेवले जात असल्याने सदस्यांना महत्वच उरले नाही यामुळे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मोठी उदासीनता पाहण्यास मिळत आहे याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने थेट जनतेतून निवडीचा निर्णय रद्द केला होता परंतु सरकार बदलतात शिंदे फडणीस नवीन सरकारने पुन्हा हा निर्णय घेतला यामुळे अनेक सदस्यांमधून नाराजी चा सूर निघत आहे या सरकारला हाच निर्णय योग्य वाटत असेल तर मग ज्या प्रकारे नगरसेवकांना प्रभागात विकास कामे करण्यासाठी निधी मिळतो त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांनाही वार्डात विकासासाठी निधीची तरतूद करून दिली पाहिजे कारण एखाद्या ग्रामपंचायत सरपंच एका गटाचा आणि सदस्य दुसऱ्या गटाचे निवडून आले तर परिणामी त्या सदस्यांना दुजाभाव केला जातो आणि त्या सदस्यांच्या वार्डातील विकास कामे केली जात नाही अशी जर सदस्यांची कोंडी होत असेल तर सदस्य होण्यासाठी निवडणूक कोण लढवणार सदस्य म्हणून निवडून येऊन उपयोग काय?
असा प्रश्न निर्माण होतो यामुळे या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करून सदस्यांच्या अधिकारात वाढ करून वार्ड विकासासाठी निधीची तरतूद करून दिली पाहिजे असे मत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष कल्पेश आहेर यांनी व्यक्त केले आहे

