[masterslider id="2"]
स्थानिक बातम्या

चांदवडला देवेंद्र फडणवीसाचा वाढदिवस डाक विभागाची लाभदायी अपघात विमा कार्ड वाटप करून साजरा.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

 

डाक विभागाची ही योजना चांदवड शहरात एक वैशिष्ट्यपूर्ण योजना ठरली.
गोरगरिबांना लाभ मिळाला हेच वाढदिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट सफल झाले.

चांदवड : चांदवड शहरात (दि.२२) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ही योजना सफल ठरली आहे. चांदवड शहरातील १११ कुटुंबप्रमुखानी या योजनेचा लाभ घेतला ही योजना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस (ग्रा.) भूषण कासलीवाल व रिंकू कासलीवाल यांच्या व ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेस जसे ज्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट आहे. जे आपला अपघाती विमा काढू शकत नाही, अशा व्यक्तींना देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इतर व्यर्थ खर्च न करता कासलीवाल यांनी स्वतः खर्च उभारून १११ नागरिकांना अपघात विमा काढून दिला. नागरिकांमध्ये अत्यंत उत्साहाचे वातावरण होते. यामध्ये डाक विभागाची लाभदायी योजना राबवत असताना इतर नागरिकांनीही याचा लेट का होईना लाभ घ्यावा असे कासलीवाल यांनी उद्घाटनाप्रसंगी सांगितले. या योजने मध्ये ३९९ रुपये भरून दहा लाख रुपयाचा अपघाती विमा मिळतो. यात अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख,कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख, दवाखान्याचा खर्च साठ हजार, मुलांचा शिक्षण खर्च एक लाख, दवाखान्यात असेपर्यंत दररोज एक हजार, ओपीडी खर्च तीस हजार, अपघाताने पॅरलेसेस झाल्यास दहा लाख, कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च पंचवीस हजार, या प्रकारचे लाभ या विमा पॉलिसीमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी वयोमर्यादा १८ ते ६५ वर्ष अशी होती. यात लाभ घेतलेल्या नागरिकांनी कासलीवाल यांचे आभार मानत आनंद साजरा करताना दिसले. यावेळी उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल, बाळा पाडवी, संजय क्षत्रिय, सचिन खैरनार, आदी नागरीक उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी राजेंद्र वानखेडे डाक निरीक्षक चांदवड उपविभाग अरुण चंदन, नितीन वागले,दत्तू चव्हाण, पोपट गोडसे, मधुकर हिरे,सागर पवार,दिव्या भारती कल्याणी कोतवाल, मंगला शिंदे, ज्ञानेश्वर चौगुले, किरण शिरसागर, गणेश महाले, अनिल सोनवणे, राहुल अहिरे, अभिषेक धिंगे, निता साळी,गणेश देवकर,यांनी ग्लोबल रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनचे सहकारी यांनी मेहनत घेतली.

 

भूषण कासलीवाल

मी बॅनर व इतर व्यर्थ खर्च टाळत देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस डाक विभागाची लाभदायक विमा योजना राबून साजरा केला. देव कृपेने असे अपघाती संकट कोणावर येऊ नये परंतु असे काही झाल्यास या कुटुंबप्रमुखांना यांच्या परिवाराला पूर्णपने याचा लाभ व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फडणवीस साहेबांचा वाढदिवस या प्रमाणे साजरा केला हेच आमच्या साठी महत्वाचे आहे.
(भूषण कासलीवाल, भाजपा जिल्हा सरचिटणीस)

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या