[masterslider id="2"]
स्थानिक बातम्या

SNJB फार्मसी महाविद्यालयास NIRF मानांकन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

SNJB फार्मसी महाविद्यालयास NIRF मानांकन

चांदवड: राष्ट्रीय पातळीवर देशभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ २०२२ ची क्रमवारी जाहीर झाली असून चांदवड येथील एस.एन.जे.बी च्या श्रीमान श्रीमन सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसीने शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) क्रमवारीत देशभरातल्या ३५११ महाविद्यालयातून टॉप 102-125 फार्मसी महाविद्यालयांमध्ये स्थान पटकावले आहे.

माननीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान भारत सरकार यांच्या हस्ते शुक्रवारी ही क्रमवारी जाहीर करण्यात आली .
रँकिंग फ्रेमवर्क हे शिक्षण, शिक्षण आणि संसाधने (TLR), संशोधन आणि व्यावसायिक सराव (RP), ग्रॅज्युएशन आउटकम (GO), आउटरीच आणि समावेश (OI) आणि परसेप्शन (PR) च्या पॅरामीटर्सच्या पाच व्यापक सामान्य गटांच्या अंतर्गत संस्थांचे रँकिंग करण्यात येते. पॅरामीटर्सच्या या पाच गटांपैकी प्रत्येकासाठी दिलेल्या संख्यांच्या बेरजेवर आधारित रँक दिल्या जातात.

“गेल्या काही वर्षात फार्मसी महाविद्यालयाने अनेक मोठे R&D प्रकल्प राबविले आहेत आणि सरकारी यंत्रणा आणि सार्वजनिक तसेच खाजगी उद्योगांना मार्गदर्शन सेवा देखील प्रदान करीत असतात.

संस्थेचे सामर्थ्य अत्याधुनिक संशोधनाव्यतिरिक्त तिच्या दर्जेदार प्राध्यापकांमध्ये, संशोधन विद्वानांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेरील अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या सहकार्याने अनेक नवीन संकल्पना देखील नियमीतपणे राबविल्या आहेत.
या महाविद्यालयाला यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2020 मध्ये ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक महाविद्यालय म्हणून सन्मानित केले होते तसेच NBA मानांकन देखील मिळालेले आहे.

या NIRF मानांकनामुळे संपूर्ण चांदवड तालुक्याचे नाव उंचावले आहे. ग्रामीण भागातील संस्थाचें वाढते यश निश्चितच समाधानकारक आहे.

संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे चेअरमन अजितकुमार सुराणा, व्हा.चेअरमन अरविंदकुमार भन्साळी, सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी,महाविद्यालयाचे समन्वयक ऍड. प्रकाश बोकाडिया, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी.डी.उपासनी तसेच सर्व विभागप्रमुख आणि सर्व कर्मचाऱ्यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून पुढील वर्षी NIRF रँकिंगमध्ये पहिल्या 100 मध्ये येण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

 

बेबीलालजी संचेती

आमच्या संस्थेला NIRF रँकिंगमध्ये भारतातील फार्मसी महाविद्यालयांच्या टॉप 102-125 मध्ये स्थान मिळाले आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे,
हि बाब आम्हाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देऊन सक्षम बनवण्याचे आमचे ध्येय पूर्ण करण्यास निश्चित मदत करेल.

बेबिलाल संचेती
अध्यक्ष
SNJB विश्वस्त समिती

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या