[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

आरक्षण सर्वसाधारण होताच मेसनखेडे पंचायत समिती गणात इच्छुकांच्या अशा पल्लवीत 

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

आरक्षण सर्वसाधारण होताच मेसनखेडे पंचायत समिती गणात इच्छुकांच्या अशा पल्लवीत 

चांदवड तालुक्यातील दुगाव जिल्हा परिषद गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने इच्छुकांचा मोर्चा आता जिल्हा परिषदेऐवजी पंचायत समितीकडे वळण्याची शक्यता आहे .दुगाव जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या दुगाव पंचायत समिती गण व मेसनखेडे पंचायत समिती गणाचे आरक्षण अनुक्रमे दुगावकरिता सर्वसाधारण स्री तर मेसनखेडे गणात सर्वसाधारण असे निघाल्याने आरक्षणाची वाट बघणारे इच्छुक आता प्रत्यक्ष कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. आरक्षणाचे सोडत कळताच इच्छुकांची फोणाफाणी सुरू झाली आहे. काही इच्छुक तर प्रत्यक्ष मतदारांना भेटण्याच्या तयारीत आहेत आरक्षण निघाल्याने काही दिवसांत निवडणुकांची घोषणा होऊ शकते. त्यामुळे वेळ न दवडता इच्छुक आता तिकिटासाठी जोरदार बिल्डिंग लावण्याच्या तयारीत आहेत.

राजेंद्र गिडगे

अमोल देवरे

डॉ स्वाती देवरे

भगवान खताळ

गंगाधर बिडगर

जगदीश शेळके

मेसन खेडे पंचायत समिती गणात काँग्रेस तर्फे कुंदलगावचे माजी सरपंच तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र नामदेवराव गिडगे, राष्ट्रवादीतर्फे वाद वराडी सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायतचे उपसरपंच भगवान मारुती खताळ भारतीय जनता पार्टी तर्फे निमोण येथील माजी सरपंच डॉक्टर स्वाती भाऊराव देवरे , दरेगाव चे सरपंच अमोल देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डोणगावचे सरपंच जगदीश शेळके तसेच काही उमेदवार शिवसेनेकडूनही इच्छुक आहेत. मेसनखेडे येथील सोसायटी संचालक गंगाधर बिडगर पंचायत समिती निवडणूक उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या तरीही इच्छुकांची प्राथमिक नावे आहेत. त्यात अजून भर पडू शकते शेवटी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याची उमेदवारी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात दिसेल. आज तरी निवडून येण्याची क्षमता हाच निकष विविध पक्षांकडून लावला जाईल. त्यामुळे या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना व भारतीय जनता पार्टी या पक्षांची चार उमेदवार राहण्याची शक्यता असून अजून काही अपक्ष उमेदवार रिंगणात उतरू शकतात. शिवाय जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने जिल्हा परिषद उमेदवारास बळ देणारा व स्वतःबरोबरच जिल्हा परिषद उमेदवारास निवडून आणण्यास उमेदवाराची जास्त मदत होईल अशा उमेदवारांना पंचायत समिती निवडणुकीत तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आता गणातील उमेदवाराला स्वतःबरोबरच जिल्हा परिषदेतील उमेदवाराचीही स्वतःबरोबरच जबाबदारी पेलावी लागणार आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या