नियमित कर्जफेड करणाऱ्या 50 हजार अनुदान योजनेत 2016/17 या वर्षाचा समावेश करन्याची सोनीसांगवी सोसायटी चेअरमन शैलेश ठाकरे यांची मागणी
आपल्याकडे 2017/18, 18/19, 20 /21 या तीन वर्षात नाशिक जिल्हा बँकेने वाटपच केलेल नाही वाटप केले असते तर आपल्याकडील शेतकरी 99% कर्ज वेळेवर फेडत असतात येथे वाटपच नसल्यामुळे परतफेडीचा प्रश्न नाही. त्यामुळे या योजनेत आपल्या चांदवड/देवळा तालुक्यातील फार कमी संख्येने शेतकरी पात्र होत आहेत. उर्वरित जिल्हा बँकांना या योजनेत सर्व सभासदांना फायदा होणार आहे यात आपली बँक अडचणीत असल्याने खूप कमी लाभ नाशिक जिल्ह्याला होणार आहे.
माझ्या सोनीसांगवी विविध कार्यकारी सोसायटीत फक्त दोन सभासद पात्र होत आहेत. याकामी शासनाकडे पाठपुरावा करून 2016/17 या वर्षाचा समावेश जर केला तर या वर्षात कर्जाची उचल होऊन नियमित परतफेड केलेले 99 टक्के शेतकरी आहेत तरी आमदार साहेबांनी नक्कीच पाठपुरावा करावा ही आमची तालुक्यातील सर्वपक्षीय सोसायटी पदाधिकाऱ्यांची वतीने करीत असल्याचे शैलेश गंगाधर ठाकरे (व्हा. चेअरमन सोनीसांगवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ) यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी आपले निवेदन आमदार डॉक्टर राहुल आहेर व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनाही पाठवले आहे

