[masterslider id="2"]
स्थानिक बातम्या

मानवस्पर्श सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

मानवस्पर्श सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न.

मानवस्पर्श सेवाभावी संस्था, लासलगाव यांच्या माध्यमातून 23 जुलै 2022 शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भारतनगर (भडाणे) ता.चांदवड येथील 60 विद्यार्थ्यांना मराठी,इंग्रजी अंकलिपी, मिक्स वही,पेन्सिल,चित्रकला वही,पाटी व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाकी गावचे भूमिपुत्र भुसावळ येथील कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक मा.श्री.सोमनाथ वाघचौरे साहेब होते.प्रास्ताविक मा.प्रा.सुनिल देवढे सर यांनी केले.
श्री.सोमनाथ वाघचौरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना मुलांना शिक्षण व शिक्षक यामुळे आपण जिवनात यश मिळवू शकतो असा मोलाचा संदेश दिला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ऍड.सुनिल वाघचौरे, उपाध्यक्ष श्री.सूर्यकांत जाधव,कार्यध्यक्ष प्रा.अरुण देवढे तसेच, मा.पं.स.सभापती शिवाजी आहेर,मा.पं.स.सदस्य देविदास आहेर,गावचे सरपंच सुनिल आहेर,उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे,अशोक आहेर,साहेबराव गांगुर्डे, प्रकाश बनकर,वामन मोरे,रविंद्र सोनवणे,सुनिल जाधव व ग्रामस्थ, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव समीर देवढे सर,विश्वस्त योगेश न्याहारकर, डॉ.शशिकांत देवढे,सोपान जाधव,ज्ञानेश्वर देवढे,सौ.सुरेखा देवढे, अनंत सोमवंशी(अमेरिका), ज्ञानेश्वर शिंदे(पुणे),गोरख देवढे सर,सचिन शेलार सर,प्रताप आढाव सर व गणेश औटी सर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रतन गोरे सर व सौ.भारती जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या