[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

मनमाड येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

मनमाड येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन

आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन मनमाड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष श्री अफजलभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली दि. १३ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. शहरातील काँग्रेस भवन येथून पदयात्रेची सुरवात मोठ्या दिमाखात करण्यात आली. भारत माता कि जय, वंदे मातरम, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांनी पदयात्रा जाऊन मालेगाव रोड येथे पदयात्रेचा समारोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष मा. राजारामजी पानगव्हाणे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळेस उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. या पदयात्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजारामजी पानगव्हाणे, शहराध्यक्ष अफजलभाई शेख, रमेशभाऊ कहांडोळे, सुभाषभाऊ नहार, भीमराव जेजुरे, ऍड. शशिकांत व्यवहारे, मा. नगरसेवक संजयभाऊ निकम, नाजीमभाई शेख, कॉ. रहमान शाह, अशोककाका व्यवहारे, प्रेमराज बेदमुथा, पारसशेठ बरडिया,मी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपकभाऊ गोगड, मा. नगराध्यक्ष बबलूभाऊ पाटील, नानाभाऊ शिंदे, हबीबभाई शेख, अमोल बोथरा,अक्षयभाऊ देशमुख, कोमलताई निकाळे, दिपाताई कोरडे, फकीराशेठ शिवदे,ऍड. पाटील, अनिलभाऊ देवरे, बाळासाहेब साळुंके, ऍड. वाल्मिक जगताप, अन्सार शाह, जाहिद शेख,अजीज पठाण, इलियास पठाण, सईद दादा, हिरामण कुसमाडे,मी श्री संसारे, ऍड. फरीदा मिठाईवाला, मुमताज आपा, फातेमा आपा,समिना आपा,राहत फौंडेशनचे कयाम सैय्यद, सोहेल जाफरी, आबिद शेख, हुजेफा खान, रिजवान कुरेशी, फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे अध्यक्ष बेग चाचा, कार्याध्यक्ष फिरोजभाई शेख, मुश्ताक सर, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे भीमराज लोखंडे,रमेश आव्हाड, विष्णू चव्हाण, गायकवाड गुरुजी यासह प्रमुख पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या