[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

चांदवडला वादळी पावसाने महावितरणची झाली चांदी… अबब, दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च, चौकशीची मागणी

चांदवडला वादळी पावसाने महावितरणची झाली चांदी
अबब, दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा खर्च, चौकशीची मागणी

रेडगांव खुर्द दि 18 एखाद्या सबंधित घटकावर आलेले संकट कधीकधी दुसऱ्यांसाठी सुवर्णपर्वणीचा काळ कसा करू शकतो. याचा उत्तम नमुना म्हणजे चांदवड तालुक्यात 9 जून रोजी वादळी पावसाने मुख्यता चांदवड शहरात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब पडून महावितरणचे नुकसान झाले होते .हे वास्तव जरी खरे असले तरी त्या दुरुस्तीसाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे.पत्रकार विजय काळे यांनी माहिती अधिकारात ही माहिती विचारली होती. दुरुस्तीसाठी इतका अवाढव्य खर्च यावा ही बाब निश्चितच सर्वसामान्यांना खटकणारी असल्याने या संपूर्ण दुरुस्तीच्या कामकाजाची चौकशी होण्याची गरज आहे.
तालुक्यात 9 जून रोजी चांदवड शहरात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. वादळाची तीव्रता मोठी असल्याने अनेक पोल पडले तारा तुटल्या. त्यामुळे वीज प्रवाह काही काळासाठी बंद झाला होता .वादळी पावसाने नुकसान झाल्यानंतर महावितरणने तात्काळ युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. सर्वाधिक नुकसान हे चांदवड शहरात जास्त होते .आजूबाजूला काही अंशी नुकसान झाले होते .परंतु या दुरुस्तीवर झालेल्या खर्च हा सर्वसामान्यांचे डोळे पांढरे करणारा आहे. पावसाळापूर्व दुरुस्तीसाठी महावितरणने वर्षभरात (लोंबकळणाऱ्या तारा ओढणे पोल सरळ करणे झाडांच्या फांद्या तोडणे) काय कामे केली इत्यादी माहिती माहिती अधिकारात महावितरण कडे मागितली असता, त्यामध्ये ही डोळे विस्फरणारी आकडेवारी समोर आल्याने सामान्य जनतेच्या पायाखालची वाळूच सरकली आहे .तसेच ही सर्व कामे खाजगी कंत्राटदारांकडूनच करून घेतली असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे काम काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच या खाजगी कंत्राटदारांनी ज्या ठिकाणी दुरुस्तीची कामे केली त्या ठिकाणी पोल पडला असेल तर तेवढा पोलच उभा केला. त्या आजूबाजूचे पोल सरळ केले नाही किंवा लोंबकळणाऱ्या ताराही ओढल्या नाहीत. मग यांना पूर्ण पैसे कुणी अदा केले तसेच या कामांवर कुणीही महावितरणचे अधिकाऱ्यांनी दुरुस्ती आधी किंवा दुरुस्तीनंतरही पाहणी करून भेटी दिल्या नाही. एकूणच ऐशी रूममध्ये टेबलावर बसून कागदावर आकड्यांची आकडेमोड करून अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांसह स्वतःची चांदी करून घेतली. मात्र अनेक ठिकाणी मूळ समस्या जैसे थे असल्याने वारंवार वीज प्रवाह खंडित होणे तांत्रिक बिघाड होणे यासारख्या घटना वारंवार घडत असतात .तसेच महावितरणने वर्षभरात कुठेही झाडांच्या फांद्या तोडल्या नाही तारा ओढल्या असे कामे अपवाद सोडले तर कुठे केल्याची दिसत नाही. आणि जर ही कामे केली असती तर वादळामध्ये महावितरणचे इतके नुकसान झालेच नसते. म्हणून हा दीड कोटी रुपयांचा खर्च कुठे आणि कोणासाठी केला याची सखोल चौकशी झाल्यास नक्कीच दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल.

आकडेवारी
चांदवड उपविभागांतर्गत 12 उपविभाग
समाविष्ट गावे – 115

नवीन सिमेंट पोलसह एक गाळा ओढण्यासाठी एका पोलचा खर्च सर्व साहित्यासह 7131 रुपये इतका येतो.

वर्षभरात पिंपळगाव उपविभागात पावसाळापुर्व कामांसाठी 9 लाख रुपये खर्च करण्यात आला.

निव्वळ एक सिमेंटचा पोल 1900 रुपये खर्च

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या