सलादे बाबांनी दिशाहीन जीवन जगणाऱ्यांना अध्यात्मिक मार्गाने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला – उपसरपंच योगेश साळुंके
सलादे बाबांनी दिशाहीन जीवन जगणाऱ्यांना अध्यात्मिक मार्गाने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला वडनेर भैरव चे आध्यात्मिक भूषण म्हणून आम्हा वडनेर भैरवकरांना अभिमान आहे असे मत वडनेर भैरव चे उपसरपंच योगेश साळुंके यांनी वडनेर भैरव येथे नाथउपदेशी सलादे बाबा यांना अकराव्या पुण्यतिथी निमित्ताने सलादे बाबा दत्त मंदिर येथे अभिवादन करताना व्यक्त केले अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा फुले पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष श्री निवृत्ती माळी होते वडनेर भैरवी येथे सलादे बाबा यांच्या अकराव्या पुण्यतिथी निमित्ताने सलादे बाबा कला क्रीडा मंडळ वडनेर भैरव परिसर दत्त सेवा संस्था आणि वडनेर भैरव ग्रामस्थ यांच्या वतीने अभिवादन व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली होते 
सलादे बाबा दत्त मंदिरात कुलस्वामिनी जोगेश्वरी माता च्या प्रतिमेला श्री बापूसाहेब पाचोरकर यांनी पुष्पहार अर्पण केला तर सलादे बाबा मूर्तीस भैरवनाथ ट्रस्टचे संचालक राजाभाऊ भालेराव व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक भाऊसाहेब भालेराव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला दत्त महाराज मूर्तीला सलादे बाबा ट्रस्टचे विश्वस्त रामचंद्र आप्पा मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर दत्त मंदिरात आरती वडनेर भैरव उपसरपंच योगेश साळुंके यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात माजी उपसरपंच रावसाहेब भालेराव एकता ग्रुपचे संजय भालेराव सुरेश पवार बाबाजी सलादे लक्ष्मण सलादे ग्रामपंचायत सदस्य अमोल माळी शिवसेना नेते लक्ष्मण सलादे नाना वाटपाडे खंडेराव महाराज भक्त मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पाचोरकर विश्वस्त पंडित देवरे विष्णू वाढवणे दत्तात्रय निखाडे संतोष निकाळजे भारत साळुंखे संदीप जाधव किरण जाधव आदी उपस्थित होते
यावेळी स्वागत दत्त सेवा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल पाचोरकर यांनी केले आभार दीपक पाचोरकर यांनी मांडले यावेळी नाशिक जिल्ह्यातील असंख्य भाविक दत्त मंदिरात आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते श्री बबन वक्ते नाना सलादे अनिल सलादे माणिक सलादे काका सलादे अमोल सलादे बापू सलाते एकनाथ सलादे दत्तात्रय सलादे संदीप सलादे उपस्थित होते.

