ॲड. नितीन ठाकरे व डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्या रूपाने परिवर्तनाच्या नांदीने चांदवड तालुक्यात समर्थकांचा जल्लोष
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीत अॅड . सुनील ढिकले यांचा अपवाद वगळता परिवर्तन पॅनलने प्रगती पॅनलचा अक्षरश : धुव्वा उडवला . यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत अॅड . नितीन ठाकरे यांनी बाजी मारली . त्यांनी नीलिमा पवार यांचा पराभव करत तब्बल २० वर्षांनंतर मविप्र संस्थेत परिवर्तन घडवून आणले . क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या निवडणुकीत प्रगती पॅनलचा अवघा एक तर , परिवर्तनचे तब्बल २० उमेदवार विजयी झाले .
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत चांदवड तालुक्याला मानाचे पान मिळाले आहे . नितीन बाबुराव ठाकरे यांच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे सरचिटणीसपद मिळाल्याने चांदवड तालुकात आनंदाचे वातावरण आहे . गेल्या वेळेस झालेल्या निसटत्या पराभवाने अनेक सभासदांना सल लागून राहिली होती मात्र यावेळेस मोठ्या फरकाने विजय मिळाल्याने ठाकरे समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. नितीन ठाकरे यांना 4435 तर नीलिमाताई पवार यांना 3460 मते मिळाली आहे. दोघांमधील फरक 969 मतांचा आहे. मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या संचालक पदाचा चांगला अनुभव असणारे जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांच्या अनेक दिवसाच्या मेहनतीला फळ आलं असून परिवर्तनाच्या नांदीत डॉक्टर गायकवाड हे चांगल्या मतांनी निवडून आले आहे.
त्यांना 5137 तर उत्तम बाबा भालेराव यांना 440 मते मिळाली. दोघांमधील फरक 697 मतांचा आहे. नीलिमाताई पवार यांचा कामकाजासंदर्भात विरोध करणाऱ्या नितीन ठाकरे यांना अगदी सुरुवातीपासूनच डॉक्टर गायकवाड यांची खंबीर साथ मिळाली होती त्यामुळे डॉक्टरांचा विजय हा महत्त्वपूर्ण ठरतो .चांदवड तालुक्यातून प्रगती पॅनलचे माजी आमदार उत्तम बाबा भालेराव व परिवर्तन तर्फे डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांच्यात सामना झाला .गत वेळेस नीलिमाताई पवार यांच्या पॅनल तर्फे उत्तम बाबा भालेराव यांनी डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांचा पराभव केला होता. मात्र परिवर्तनाच्या नांदीत डॉक्टर गायकवाड यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळावल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .
काल नाशिक येथे समर्थकांनी हजर राहून रात्री उशिरा निकाल लागेपर्यंत डॉक्टरांच्या विजयाची प्रतीक्षा केली अखेर ही प्रतीक्षा त्यांच्या फळाला आली. तालुक्यातून गेलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. केटीएम कॉलेज जवळ व डॉक्टर गायकवाड यांच्या गंगापूर रोडवरील मन्वंतरम बंगल्यावर तसेच ठाकरे बंगल्यावर तालुक्यातील समर्थकांनी हजेरी लावून विजय साजरा केला. अध्यक्षपदासाठी प्रगतीयानिवडणुकीत अॅड . नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘ परिवर्तन पॅनल तर , नीलिमा पवारांच्या नेतृत्वात ‘ प्रगती ‘ पॅनल एकमेकांविरोधात उभे ठाकले होते . सोमवारी मतमोजणीला सुरूवात झाली . निवडणुकीत विशेषतः सरचिटणीसपदी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते . १० वर्षांपासून संस्थेचा एकहाती कारभार चालवणाऱ्या नीलिमा पवारांना सत्तेतून खाली खेचण्याचे प्रयत्न प्रत्येक निवडणुकीत करण्यात आले . मात्र , ॲड . नितीन ठाकरे यांना यश आले नाही .
गेल्या निवडणुकीत तर अवघ्या १४३ मतांनी अॅड . ठाकरे यांना पराभव पत्करावा लागला होता . यंदाच्या निवडणुकीत मात्र आक्रमक प्रचार करत अॅड . ठाकरे यांनी मागील पराभवाचे उट्टे काढत विजयश्री खेचून आणली . या विजयाने मविप्र संस्थेतील नीलिमा पवारांची १० वर्षांतील सत्ता खालसा झाली . तर , अॅड . ठाकरेंच्या माध्यमातून नवीन परिवर्तनाची नांदी ठरली . नीलिमा पवार यांचा पराभव मध्यरात्री नवव्या फेरीअखेर जाहीर झाला . या निवडणुकीत परिवर्तनचे २० उमेदवार विजयी झाले तर , प्रगती पॅनलचा एकच उमेदवार विजय झाला.



