[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

४ सप्टेंबरला मनमाड येथे बरखा कविता उत्सव 

यांनी लिहिलेले विक्रम कारभारी देवरे

४ सप्टेंबरला मनमाड येथे बरखा कविता उत्सव 

मनमाड(प्रतिनिधी)- पुढील रविवारी म्हणजे ४ सप्टेंबर रोजी येथे बरखा कविता उत्सव होणार असून मनमाड जनहित विकास संस्था,कलाक्षर साहित्य रसिक मंच व साहित्याक्षर प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आय.यु.डि.पी.तील महात्मा जोतीराव फुले अभ्यासिका सभागृहात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत एकाच मंचावरुन दोन कार्यक्रमांचा आस्वाद काव्यरसिकांना घेता येणार आहे,पहिल्या सत्रात स.१०-००वा. ‘कवी समजून घेतांना.. ‘ या संवादात्मक कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री डाॕ.राजश्री देशपांडे(सातारा)यांच्यांशी काव्यगप्पा होतील तर दुपारी २-०० वा.होणा-या ‘बरखा कविता उत्सव’या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत व नवोदीत युवा कवींच्या ‘पाऊसकविता’काव्यरसिकांना अनुभवता येणार आहेत.
डाॕ.राजश्री देशपांडे या मनोविकारतज्ज्ञही असून श्रोत्यांच्या काव्यविषयक व मनोव्यापारविषयक प्रश्नांना त्या उत्तरे देतील. साहित्यिक डाॕ.संजय बोरुडे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंवादक असतील.
तरी या दोनही कार्यक्रमाचा आस्वाद साहित्यरसिकांनी घ्यावा असे आवाहन मनमाड जनहित विकास संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार श्री.अशोकआप्पा परदेशी, साहित्याक्षर प्रकाशनाच्या सौ.क्रांती राऊत ,समन्वयक रचना व कलाक्षरचे निमंत्रक साहित्यिक जनार्दन देवरे यांनी केले आहे.
या कविता उत्सवात उपस्थित काव्यरसिकांनाही आपली ‘पाऊसकविता’सादर करावयाची संधी मिळणार आहे.सहभागी कवींना बरखा कविता उत्सव सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.यासाठी कवींनी ९३२६६६७५८० , ७०४०२३९९७० व ९८५०९७२४२६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.

लेखकाबद्दल

विक्रम कारभारी देवरे

एक टिप्पणी द्या