[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

म.वि.प्र.निवडणुकीत अँड.गुळवेच्यां विजयाने काँग्रेसचे हौसले बुलंद ? आता कसोटी जि.प.निवडणुकीत ?

स्व.गोपाळराव गुळवे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ नाशिक या शैक्षणिक संस्थेचा कारभार कै.गुळवेच्यां पश्चात अँड.संदीप गुळवे हे समर्थ पणे सांभाळत होते.दरम्यान या संस्थेच्या कारभाराचा त्यांना दांडगा अनुभव असुन याचा निश्चित फायदा आगामी काळात तालुका भरात होईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.

म.वि.प्र.निवडणुकीत अँड.गुळवेच्यां विजयाने काँग्रेसचे हौसले बुलंद ?

आता कसोटी जि.प.निवडणुकीत ?

ईगतपुरी- (नवनाथ गायकर)-

ईगतपुरी तालुक्यातील एकेकाळचे मातब्बर निष्ठावंत काँग्रेस नेते तथा वडिल स्व.गोपाळराव गुळवे यांची पुण्याई व त्यांच्या पश्चात सहकार व राजकारणात काही अंशी निर्माण केलेला दबदबा या बळावर ईगतपुरी तालुक्यात अल्प सभासद असतानांही अँड.संदिप गुळवे यांनी दोनदा संचालक असलेल्या भाऊसाहेब खातळे यांचा पराभव करीत विजयश्री खेचून आणली आहे. दरम्यान अँड.गुळवे यांच्या या विजयाने दिल्ली पासुन ते गल्ली पर्यंत खचलेल्या काँग्रेसला चैतन्य प्राप्त झाले आहे. या विजयाने हुरुप वाढलेल्या काँग्रेस ने आगामी जि.प.,पं.स।निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार हिरामण खोसकर व अँड. संदिप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही काँग्रेस चमत्कार करेल असा दावा करण्यात येत आहे.
स्व.गोपाळराव गुळवे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ नाशिक या शैक्षणिक संस्थेचा कारभार कै.गुळवेच्यां पश्चात अँड.संदीप गुळवे हे समर्थ पणे सांभाळत होते.दरम्यान या संस्थेच्या कारभाराचा त्यांना दांडगा अनुभव असुन याचा निश्चित फायदा आगामी काळात तालुका भरात होईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
ईगतपुरी तालुका हा शैक्षणिक द्रुष्टीने आजही अत्यंत मागासलेला आहे. तालुक्यात अलीकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचे जाळे उत्तम पसरले असले तरी उच्च तंत्रज्ञान, विविध शैक्षणिक कोर्सेस वा अन्य पुरक शैक्षणिक विदयालयाचां तालुक्यात मोठ्या प्रमाणात अभाव आहे.
म.वि.प्र.च्या माध्यमातून अँड.संदीप गुळवे ही उणीव आगामी काळात भरून काढतील असा विश्वास व्यक्त होतो आहे.
दरम्यान म.वि.प्र.तील दिमाखदार विजयाने तालुक्यात काँग्रेसचे हौसले बुलंद झाले आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षात चैतन्य पसरले आहे.
अँड.संदीप गुळवे यांच्या वरही आता अपेक्षाचें ओझे पडले असुन आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाची चांगलीच कसोटी लागणार आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबरोबरच घोटी क्रुषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या निवडणुका ही तोंडावर असुन अँड.गुळवे यांच्या नेतृत्वाचा यावेळी कस लागणार आहे.
अँड.गुळवेच्यां म.वि.प्र. निवडणुकीतील विजयाने समर्थक, कार्यकर्ते व पक्षाचा उत्साह दुणावला आहे. या उत्साहाचे रुपांतर आगामी काळात विजयात होते काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल अशी चर्चा सर्वत्र रंगते आहे.

लेखकाबद्दल

पत्रकार नवनाथ गायकर - इगतपुरी

एक टिप्पणी द्या