विसापुर येथे गणेशोत्सावात रक्तदान शिबीरासह धार्मिक उपक्रमाचे आयोजन
आडगांव रेपाळ (वार्ताहर) – कोवीड प्रतिबंधात्मक नियमांचे बंधनातुन मोकळीक मिळाल्यामुळे यावर्षी सर्व गणेश भक्तांनी उत्साहात गणेशोत्सव साजरा करत विविध सामाजीक उपक्रमाचे आयोजन केले. येवला तालुक्यातील विसापुर येथे छत्रपती शंभुराजे गणेश मित्र मंडळ व श्री शिवशंभुचे वारकरी परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६८ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला. सर्व रक्तदात्यांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला.

या वेळी प्रत्येक रक्तदात्यास एक पांडुरंगाची मूर्ती भेट दिली.
प्रसंगी श्रीशिवशंभुचे वारकरी परिवाराचे गोरख कोटमे यांनी सांगितले कि,ग्रामीण भागातील तरुणांनी रक्तदान शिबीरासाठी तरुणांईने दिलेला प्रतिसाद अविश्वसनीय होता.छत्रपती शंभुराजे गणेशमंडळाने आपला एकोपा जपत अशीच सामाजिक कार्य करत राहिल पाहिजेत. गणेश मंडळाने आठवडा भरात श्रीगणेशासमोर जागरण गोंधळ, हरिभजन, हरिपाठ अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ही केले.याचा आदर्श इतर गणेश मंडळानी ही घ्यावा.रक्तदान शिबीरासाठी समता ब्लड बँक चे विशेष सहकार्य लाभले. छत्रपती शंभुराजे गणेश मित्र मंडळाच्या वतीने रामनाथ ढोमसे यांनी आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार मानले. नावापुढे कुणी शिवभक्त लावुन शिवभक्त होत नाही शिवभक्त त्याच्या कार्यातून दिसतो.आज छत्रपती शंभुराजे गणेश मित्रमंडळाच्या माध्यमातुन रक्तदान शिबीरातील प्रत्येक रक्तदात्यात शिवभक्त दिसला,शिवरायांचा मावळा दिसला,तुम्हा मित्रांची असणारी एकजुट खरच अविश्वसनीय होती.यापुढे ही आपल्या हातुन असेच जनसेवा घडो ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना तसेच सर्व रक्तदात्यांचे आम्ही मनःपुर्वक आभारी आहोत यावेळी छत्रपती शंभुराजे गणेश मित्र मंडळ,शिवभारत सप्ताह समिती,श्रीशिवशंभुचे वारकरी परिवाराचे पदाधिकारी तसेच विसापुर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

