[masterslider id="2"]
संमिश्र वार्ता स्थानिक बातम्या

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची महत्त्वाची बैठक

Bhujbal
यांनी लिहिलेले Sagar Jadhav

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची महत्त्वाची बैठक

महात्मा जोतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला यंदाच्या वर्षी दीडशे वर्ष पूर्ण होत आहे. या शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या संघटनात्मक चर्चेसाठी बुधवार, दि. २१ सप्टेंबर २०२२ रोजी भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे सकाळी ११ वाजता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सदर बैठकीस नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, जिल्हाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दराडे, जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, नाशिक शहराध्यक्ष कविता कर्डक, मालेगाव शहराध्यक्ष नरेंद्र सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला शहराध्यक्ष आशाताई भंदुरे यांनी केले आहे.

लेखकाबद्दल

Sagar Jadhav

एक टिप्पणी द्या